‘बालभारती’च्या मराठी भाषेतील मूळ पुस्तकांचा अनुवाद करून तो इतर भाषांमध्ये उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना, या वेळी तिसरी- परिसर अभ्यासाच्या उर्दू पुस्तकात परस्पर बदल करण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, महाराजा सयाजीराव गायकवाड, पंडिता रमाबाई, कर्मवीर भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुख यांची छायाचित्रे या पुस्तकातून काढून टाकण्यात आली आहेत. परस्पर केलेल्या बदलांची वाच्यता होऊ नये म्हणून ‘बालभारती’च्या वरिष्ठांकडून ही बाब दडपण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची (बालभारती) निर्मितीच मुळी राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी समान अभ्यासक्रम व उद्दिष्टे असलेले पुस्तके उपलब्ध करून देणे या हेतूने झाली. त्यामुळे पाठय़पुस्तकांच्या मूळ प्रती तयार केल्यानंतर त्या इतर सर्व भाषांमध्ये अनुवाद करून वापरल्या जातात. त्यात बदल केला जात नाही. तो करायचाच असेल तर पाठय़पुस्तकाचे लेखन करणाऱ्या संबंधित समितीची तशी लेखी परवानगी घेणे बंधनकारक असते. या वेळी तिसरी- परिसर अभ्यासाच्या पाठय़पुस्तकात शिक्षण क्षेत्रात कार्य केलेल्या महाराष्ट्रातील सुधारकांचा उल्लेख आहे. त्यांची छायाचित्रे देऊन त्यांच्या कार्याची माहिती घेण्याचा उपक्रम ठळकपणे देण्यात आला आहे.
मूळ मराठी भाषेतील पुस्तकात पृष्ठ क्रमांक ११३ वर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह शाहू महाराज, महर्षी कर्वे, सयाजीराव गायकवाड, पंडिता रमाबाई, भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख या नऊ सुधारकांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. इतर भाषांच्या पाठय़पुस्तकात या सर्वाची छायाचित्रे आहेत. मात्र, उर्दू अनुवादित पाठय़पुस्तकात यापैकी सहा जणांची छायाचित्रे वगळण्यात आली आहेत. त्यात मौलाना अबुल कलाम आझाद, झाकीर हुसेन आदी. इतर सहा जणांची छायाचित्रे देण्यात आली आहेत.
हा बदल परस्पर केल्यानंतर याची वाच्यता होऊ नये व त्यावर प्रतिक्रिया येऊ नयेत, यासाठी ‘बालभारती’कडून काळजी घेतली जात आहे.
 पाठय़पुस्तकात उल्लेख असलेले सर्व सुधारक महाराष्ट्रातील आहेत. त्यांचे कार्य कोणत्या गटापुरते किंवा समाजापुरते सीमित नव्हते. राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांची ओळख व्हावी, यासाठी त्यांची छायाचित्रे दिलेली आहेत. ती वगळून त्यांच्या जागी राष्ट्रीय पातळीवरील सुधारकांची छायाचित्रे टाकण्यामागचा नेमका उद्देश काय, हे स्पष्ट झालेले नाही.

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…