28 September 2020

News Flash

घरकाम करणाऱ्या बेली डान्सरने आठ लाखांचा हिऱ्यांचा हार केला लंपास

आरोपीला सांगवी पोलिसांनी केली अटक, सोन्याचे सिक्के देखील केले हस्तगत

घरकाम करणाऱ्या बेली डान्सरने घर मालकाच्या घरीच चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरातील कपाटात ठेवलेला आठ लाख रुपयांचा हिऱ्यांचा हार आणि सोन्याचे सिक्के असा एकूण नऊ लाख रुपयांचा ऐवज नामदेव विठ्ठल चव्हाण याने लंपास केला होता. परंतु, त्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयंती वासुदेव अय्यंगार यांच्या घरी आरोपी नामदेव चव्हाण हा तीन वर्षांपासून स्वयंपाकी म्हणून व घरातील अन्य कामांसाठी होता. शिवाय मिळालेल्या वेळेत तो आपली बेली डान्सची हौस देखील भागवत होता.

अय्यंगार यांच्याकडून मला कमी पगार मिळत होता. शिवाय इतर ठिकाणी काम करू नकोस असे देखील बजावण्यात आले होते. त्यामुळेच या जाचाला कंटाळून मी चोरी करणाऱ्याचे पाऊल उचलले, असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.

आरोपी नामदेव चव्हाण याच्याकडे हिऱ्यांचा हार, दोन सोन्याचे सिक्के असा ऐवज मिळाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने चोरी केल्याची कबुली दिली असून त्याला जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व दत्तात्रेय गुळीग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 4:59 pm

Web Title: balley dancer stole eight lakh diamond necklace msr 87 kjp 91
Next Stories
1 आता काचेच्या भिंतीतून सौर उर्जेची निर्मिती, शरद पवारांच्या हस्ते प्रकल्पाचे उदघाटन
2 ‘एमपीएससी’च्या नव्या जाहिरातीबाबत उमेदवारांचा आक्षेप
3 भीमथडी घोडय़ांच्या जतनासाठी प्रयत्न -पवार
Just Now!
X