News Flash

निकालाच्या दिवशी विजयी मिरवणुकांना बंदी

निकालाच्या दिवशी विजयी मिरवणुकांना पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सहपोलीस आयुक्त संजय कुमार यांनी काढला आहे.

| October 18, 2014 02:58 am

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या रविवारी शहरात दोन ठिकाणी आणि जिल्ह्य़ात त्या त्या तालुक्यांना होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी विजयी उमेदवारांना आनंद साजरा करण्यासाठी मिरवणूक काढता येणार नाही. निकालाच्या दिवशी विजयी मिरवणुकांना पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सहपोलीस आयुक्त संजय कुमार यांनी काढला आहे.
शहरात बालेवाडी येथे कोथरुड, खडकवासला, भोसरी, पिंपरी, चिंचवड हे पाच मतदार संघ आणि कोरेगाव पार्क या ठिकाणी कसबा, हडपसर, पुणे कॅन्टोमेन्ट, पर्वती, वडगावशेरी या सहा विधानसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. तर, जिल्ह्य़ामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होईल. त्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. निकालानंतर उमेदवारांकडून विजयी मिरवणुका काढल्यामुळे वाद निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे निकालाच्या दिवशी विजयी मिरवणुकांना बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सह पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2014 2:58 am

Web Title: ban on victory procession
टॅग : Ban
Next Stories
1 डॉ. शोभा अभ्यंकर यांचे निधन
2 एक सकाळ.. मतदानानंतरची!
3 ‘त्या’ विधानांबाबत चव्हाण यांची दिलगिरी
Just Now!
X