िपपरी महापालिका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी बबन िझजुर्डे आणि कार्याध्यक्षपदी हनुमंत लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवाजी येळवंडे, मुकुंद वाखारे, रोहिणी गव्हाणकर, चारूशीला जोशी, मनोज माछरे, रेखा गाडेकर, अंबर चिंचवडे, अविनाश ढमाले, महाद्रंग वाघेरे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, बाळासाहेब कापसे, पांडुरंग म्हस्के, दीपक गळीतकर आदींचा कार्यकारिणीत समावेश आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा महापौर शकुंतला धराडे, आयुक्त दिनेश वाघमारे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 4, 2016 4:04 am