25 February 2021

News Flash

उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडू गायकवाड

पुण्याच्या उपमहापौर पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे बंडू गायकवाड विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माधुरी सहस्रबुद्धे यांचा ४२ मतांनी पराभव केला.

| September 11, 2013 02:45 am

पुण्याच्या उपमहापौर पदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसचे बंडू गायकवाड विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माधुरी सहस्रबुद्धे यांचा ४२ मतांनी पराभव केला. गायकवाड यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची ८३ मते मिळाली, तर सहस्रबुद्धे यांना भाजप-शिवसेना युतीची ४१ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली. या निवडीमुळे महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे एकाच प्रभागाला प्रथमच मिळाली आहेत.
महापालिकेच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत महापौर निवडणुकीप्रमाणेच निकाल लागणार हे स्पष्टच होते. त्यानुसार आघाडी विरुद्ध युती अशी निवडणूक झाली आणि मतदानानंतर बंडू गायकवाड यांचा विजय घोषित करण्यात आला. गायकवाड उपमहापौपदी निवडून आल्याचे जाहीर होताच विरोधी पक्षनेता व काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी त्यांना उचलून घेतले आणि ‘एकचा तात्या, बंडू तात्या’ अशा जोरदार घोषणा सभागृहात देण्यात आल्या. गायकवाड यांच्या कुटुंबीयांनीही त्यांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
महापौर चंचला कोद्रे, खासदार सुरेश कलमाडी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, विनायक निम्हण, दीप्ती चवधरी, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे आदींनी गायकवाड यांचे या वेळी अभिनंदन केले. गायकवाड प्रभाग क्रमांक २० ब (मुंढवा) या जागेवर निवडून आले असून ते महापालिकेत सलग तीन वेळा निवडून आले आहेत. महापौरपदी निवडून आलेल्या चंचला कोद्रे प्रभाग क्रमांक २० अ (मुंढवा) मधून निवडून आल्या असून महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे एकाच प्रभागाला मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 2:45 am

Web Title: bandu gaikwad elect as a deputy mayor
टॅग : Ncp
Next Stories
1 माझे हात लांब आहेत.. कलमाडी यांचे सूचक विधान
2 मुलावर चाकूचे वार करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न
3 उच्च न्यायालयाच्या खंडपीठ मागणीसाठी वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Just Now!
X