02 December 2020

News Flash

उपमहापौरपदी आघाडीतर्फे बंडू गायकवाड

पुण्याच्या उपमहापौरपदाकरिता होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे बंडू गायकवाड

| September 7, 2013 06:09 am

पुण्याच्या उपमहापौरपदाकरिता होत असलेल्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे बंडू गायकवाड यांनी त्यांचा अर्ज शुक्रवारी दाखल केला, तर भाजप-शिवसेना युतीतर्फे माधुरी सहस्रबुद्धे यांनी अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीसाठी आघाडीचा उमेदवार असल्यामुळे गायकवाड यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे एकाच प्रभागातील महापौर आणि उपमहापौर असे प्रथमच घडणार आहे.
उपमहापौरपदासाठी १० सप्टेंबर रोजी निवडणूक होत असून त्यासाठीचे अर्ज शुक्रवारी दाखल करायचे होते. काँग्रेसचे बंडू गायकवाड आणि भाजपच्या माधुरी सहस्रबुद्धे यांनी या मुदतीत अर्ज दाखल केले. महापौर निवडणुकीत काँग्रेस आघाडीची सर्व मते चंचला कोद्रे यांना, तर युतीची सर्व मते सोनम झेंडे यांना मिळाली. त्यामुळे उपमहापौर निवडणुकीतही आता हेच चित्र कायम राहील. मनसे या निवडणुकीतही तटस्थ भूमिका घेईल.
गायकवाड यांचा अर्ज भरताना महापौर चंचला कोद्रे, काँग्रेसचे  शहराध्यक्ष अभय छाजेड, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौरपदी निवड झालेल्या कोद्रे आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरलेले गायकवाड हे दोघेही सन २०१२ मधील महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २० (मुंढवा) मधून निवडून आले असून त्यामुळे आता एकाच प्रभागाला ही दोन्ही पदे मिळणार आहेत.
मुख्यमंत्री, कलमाडी यांच्यामुळे..
अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलतना गायकवाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार सुरेश कलमाडी या सर्वामुळे उमेदवारी मिळाल्याचे आवर्जून सांगितले. त्यामुळे शहर काँग्रेसवर कलमाडी गटाचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 6:09 am

Web Title: bandu gaikwad from cong ncp and madhuri sahasrabuddhe fron sena bjp
Next Stories
1 टप्पा पद्धतीमुळे छोटय़ा अंतरासाठी मोठा फटका
2 आश्रम शाळांमध्ये बारा वर्षांत ७९३ विद्यार्थी मृत्युमुखी
3 हल्लेखोरांच्या रेखाचित्राशी साम्य असणाऱ्या पंधरा जणांची चौकशी
Just Now!
X