बँकेतून पैसे काढताना तुम्हाला आगाऊ रक्कम आली आहे. ती परत करा, अन्यथा तुमच्याविरोधात पोलिसांत तक्रार करू, अशी धमकी दिल्याने भीतीपोटी एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे घडली. महेश भानुदास मगुट (वय १९) असे मृत मुलाचे नाव आहे. आपल्या मृत्यूस पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक जबाबदार असल्याचे महेशने आपल्या हातावर लिहून ठेवले होते.

महेश मंगळवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काटेवाडी शाखेत आजीसोबत पैसे काढण्यासाठी गेला होता. बँकेतून उसाच्या बिलाचे ४९ हजार रूपये घेऊन घरी आल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी नजरचुकीने बँकेची आगाऊ रक्कम तुमच्याकडे आल्याचे सांगत ती रक्कम बँकेत परत जमा करण्यास सांगितले. मात्र, महेशने आपल्याकडे आगाऊ रक्कम आली नसल्याचे सांगितले. त्यानंतरही अधिकाऱ्याने महेश व आजीला बँकेत बोलावून पोलीस कारवाई करण्याची धमकी दिली. घरी परतल्यानंतर महेशने पोलीस कारवाईच्या भितीने छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवून घेण्याचे काम सुरू होते.

Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

दरम्यान, महेशच्या आजी कमल मगुट यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची भीती घातल्यामुळेच महेशने आत्महत्या केल्याचा आरोप केला. बँकेतून आम्हाला ४९ हजार रूपयेच मिळाले होते, असेही त्या म्हणाल्या. माझ्या मरणासाठी जबाबदार असलेल्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे महेशने आपल्या हातावर लिहिले.