News Flash

‘बार्टी’तर्फे विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रम

अनुसूचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. संस्थेतर्फे १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

| June 14, 2015 03:05 am

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी) व  दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्यातर्फे बँक भरती परीक्षा तसेच एल.आय.सी. व रेल्वे परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनुसूचित वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
संस्थेतर्फे १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना नऊ हजार रुपये विद्यावेतन आणि दोन हजार रुपयांची पुस्तके या प्रशिक्षणात दिली जातील. प्रशिक्षणासाठीच्या प्रवेश अर्जाचे वाटप सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ जून पर्यंत आहे. दापोडी येथील धम्मचक्र प्रवर्तन महाविहार येथे अर्ज मिळणार आहेत. जे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत तसेच शहरी भागाच्या झोपडपट्टीतील रहिवासी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा तीन महिन्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2015 3:05 am

Web Title: barti sc st student competition guidance competitive examination
टॅग : Competition,Guidance,Sc,St
Next Stories
1 वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही वापरून कारवाई करण्यास सुरुवात
2 नायडू आणि कमला नेहरू रुग्णालयात डेंग्यू चाचण्या सुरू करण्याचा राज्याचा प्रस्ताव
3 डिझेल भरण्याच्या वादातून वाकड येथील पंपावर हवेत गोळीबार!
Just Now!
X