डिजिटल युगात आयुष्यभराचा जोडीदार निवडण्यासाठी सध्याच्या घडीला अनेक जण मॅट्रोमोनियल वेबसाईटचा आधार घेताना दिसतात. पण, मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन जोडीदार निवडणं काहीवेळा महागात देखील पडू शकते. पिंपरी-चिंचवडमध्ये मॅट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून एका महिलेनं तरुणाला दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मॅट्रोमोनियल वेबसाईटवरुन महेश विलास पाटील (वय ३६, रा.जुनी सांगवी, पवना नगर) याची फसवूणक झाली आहे. महेश पाटील याने एका वेबसाईटवर विवाहासाठी नोंदणी केली होती. या वेबसाईटवरुन त्याची काव्या जयवंतराव असलकर नावाच्या तरुणीशी ओळख झाली. वेबसाईटवर नमुद केलेल्या प्रोफाइलमध्ये त्याला काव्याचा मोबाईल नंबर मिळाला. त्याने व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून तिच्याशी चॅटिंग करण्यास सुरुवात केली. गेल्या दोन महिन्यात चांगली ओळख झाल्याची खात्री पटल्यानंतर काव्याने वडिलांना ह्रद्यविकाराचा झटका आल्याचे सांगत महेशकडे पैशांच्या स्वरुपात मदत मागितली.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
nashik live stock purchase marathi news
नाशिक: लाभार्थ्यांची जनावर खरेदी आचारसंहितेच्या कचाट्यात
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश

महेशने तिच्यावर विश्वास ठेवत २५ सप्टेंबरला १ लाख ५० हजार आणि ५ आक्टोंबरला ५० हजार रुपये काव्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले. मात्र, त्यानंतर काव्याने महेशचा फोन उचलणे तसेच व्हॉट्सअॅपवरील संभाषण बंद केलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर महेशनं सांगवी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अरविंद जोंधळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.