मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांची आज पिंपरी गावठाण ते चाफेकर चौक दरम्यान बाईक रॅली होती. रॅलीची सांगता चाफेकर चौकात झाली. परंतु यामुळे चौकात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी पार्थ यांनी पाच मिनिट भाषण केल्यानं अनेक कार्यकर्ते दुचाकीसह थांबले होते.

चौकात सर्वच बाईक थांबल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली. त्यात पार्थ पवारसह युवा नेत्यांचे भाषण झाले. हे सर्व होत असताना वाहतूक कोंडी झाली. पण चिंचवड पोलीसांनी बघ्याची भूमिका घेतल्याच पाहायला मिळालं. भारत हा भाजपा मुक्त करायचा असल्याचे पार्थ म्हणाले.

पिंपरी-चिंचवड मधील शेकडो कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीत सहभाग नोंदवला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने बाईक रॅलीचे आयोजन केले होते. बाईक रॅलीत पार्थ अजित पवारसह शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवा काँग्रेस चे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी होते. हातात राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन बाईक रॅली पिंपरी गावठाण येथून निघाली जयघोष करत ते चिंचवडमधून क्रांतिवीर चाफेकर चौकात रॅली स्थिरावली तिथे सांगता झाली.