News Flash

खाटा उपलब्धतेचा पुणे पालिकेचा दावा फोल

करोनास्थिती योग्य प्रकारे हाताळणाऱ्या मुंबई पालिका आयुक्तांशी चर्चा करण्याची सूचनाही न्यायालयाने केली होती.

न्यायालयात सुनावणीच्या वेळीच शहानिशा

मुंबई : गेल्या सुनावणीच्या वेळी पुण्यातील उपचाराधीन रुग्णांची सादर केलेली आकडेवारी जुनी होती. आताची उपचाराधीन रुग्णांची संख्याही कैकपटीने कमी असून सध्याच्या स्थितीला रुग्णशय्याही उपलब्ध असल्याचा दावा पुणे पालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात केला. मात्र पालिकेच्या या दाव्याची न्यायालयाने सुनावणीच्या वेळीच शहानिशा केली आणि त्यात पालिकेचा दावा पोकळ असल्याचा आणि एकही रुग्णशय्या उपलब्ध नसल्याचे उघड झाले. या प्रकारानंतर नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याची हमी पालिकेला न्यायालयाला द्यावी लागली.

पुण्यात सद्यस्थितीला १.१४ लाख उपचाराधीन रुग्ण असल्याची आणि ही आकडेवारी मुंबईपेक्षाही कमी असल्याची माहिती राज्य सरकारने मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाला दिली होती. त्याची दखल घेत न्यायालयाने पुण्यात कठोर टाळेबंदी लावण्याची सूचना केली होती. तसेच एवढी संख्या असण्यामागील कारणे काय आणि ही स्थिती सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत याचा तपशील सादर करण्याचा आदेश दिला होते. शिवाय करोनास्थिती योग्य प्रकारे हाताळणाऱ्या मुंबई पालिका आयुक्तांशी चर्चा करण्याची सूचनाही न्यायालयाने केली होती.

मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पुण्यात सध्या ३३ हजार ७३२ उपचाराधीन रुग्ण असून १० मेला एक हजार १६५ नवे रुग्ण सापडले. करोना रुग्णांना वेळीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नियंत्रण कक्ष असून दोन मदतवाहिनीद्वारे करोना रुग्णांना आवश्यक ती मदत मागता येऊ शकते, असे पालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. रुग्णशय्यांची संख्या ही चार हजारांवरून १२ हजारांपर्यंत वाढवण्यात आल्याचे, सहा जम्बो करोना काळजी केंद्रही सुरू करण्यात आल्याचे आणि दिवसाला २० हजार चाचण्या केल्या जात असल्याची माहितीही पालिके ने दिली. त्याचप्रमाणे लवकरच प्राणवायू निर्मितीच्या बाबतीत पुणे पालिकाही आत्मनिर्भर होणार असल्याचेही सांगण्यात आले.

रुग्णशय्या उपलब्ध असल्याबाबत न्यायालयाने विचारणा के ली असता पालिकेकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले, मात्र पालिकेचा दावा चुकीचा असल्याचे याचिकाकत्र्यांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्याची दखल घेत न्यायालयाने दोन्ही याचिकाकत्र्यांना मदतवाहिनीवर संपर्क साधण्यास व कृत्रिम श्वासन यंत्रणेची सुविधा असलेली रुग्णशय्या उपलब्ध आहे की नाही याबाबत विचारणा करण्यास सांगितले.

पहिल्या याचिकाकत्र्याने संपर्क साधला त्यावेळी रुग्णशय्या उपलब्ध नसल्याचे आणि ती उपलब्ध झाल्यास कळवण्याबाबत सांगण्यात आले. त्यावर आपण या क्रमांकावर संपर्क साधला त्यावेळी सकारात्मक

प्रतिसाद मिळाल्याचे पालिकेच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. तसेच संबंधित वकिलाने रुग्णाबाबत फारच त्रोटक माहिती दिल्याचा दावाही केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:38 am

Web Title: bed availability claim of pune municipality akp 94
Next Stories
1 पुणे-मुंबई डेक्कन क्वीनही रद्द
2 टोकनसाठी पहाटे पाचला या!
3 लसीकरण केंद्रे नगरसेवकांच्या ताब्यात
Just Now!
X