News Flash

BHR Scam : भाजपाच्या जळगावमधील आमदारावर पुण्यात गुन्हा दाखल

राज्यभर गाजत असलेला आणि चर्चेचा विषय ठरलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाजपा आमदारावर गुन्हा दाखल केला आहे.

bhaichand hirachand raisoni, bhr scam, bhaichand hirachand raisoni (bhr) state cooperative credit society, economic offences wing, pune news
राज्यभर गाजत असलेला आणि चर्चेचा विषय ठरलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाजपा आमदारावर गुन्हा दाखल केला आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्था घोटाळ्यावरून राज्य रणकंदन सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून मुख्य आणि संशयित आरोपींची धरपकड केली जात असून, काही जणांना अटकही करण्यात आली आहे. यातच आता संशयित आरोपी म्हणून भाजपाच्या जळगावमधील आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केल्यानं खळबळ उडाली आहे.

बीएचआर पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या जिंतेद्र कंडारेला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी भाजपाचे जळगावमधील विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील महिनाभरात पुणे पोलिसांच्या गुन्हे विभागातंर्गत येणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेनं जवळपास १३ जणांना अटक केली आहे. यात मुख्य संशयित आरोपी जितेंद्र कंडारेचाही समावेश आहे. या प्रकरणी महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशातही छापेमारी केली होती.

संबंधित वृत्त- BHR Scam : मुख्य आरोपी जिंतेद्र कंडारेला बेड्या; वेषांतर करून लपला होता वसतिगृहात

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांनी याविषयी माहिती दिली. “चंदूलाल पटेल यांच्याविरुद्ध मागील महिन्यातच अरेस्ट वॉरंट बजावण्यात आलेलं आहे. छापेमारी करण्यात आल्यानंतर वॉरंट बजावण्यात आलं होतं. पण, ते फरार झाले होते”, अशी माहिती त्यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

भाईचंद हिराचंद रायसोनी म्हणजेच बीएचआर मल्टी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या संस्थेच्या देशभरात सात राज्यांमध्ये २६४ शाखा असून, २८००० हजार ठेवीदारांच्या ११०० कोटींच्या ठेवी आहेत. मुदत संपल्यावर देखील ठेवींच्या रकमा परत मिळत नसल्याने हा घोटाळा २०१५ मध्ये समोर आला होता. यावेळी भाईचंद हिराचंद संस्थेच्या तेरा संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी शासनाने या पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली होती. या अवसायकाने भाईचंद हिराचंद रायसोनी या पतसंस्थेच्या मालमत्ता लिलावात विकून त्यातून येणाऱ्या पैशांमधून ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता या मालमत्ता काही ठराविक लोकांना मातीमोल भावात विकल्या गेल्या.

हेही वाचा- गिरीश महाजन यांच्याविरुद्ध सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये पुरावे; ललवाणींचा दावा

या मालमत्ता विक्रीबाबतही सरकारी अधिकाऱ्यांचे बनावट शिक्के तयार करुन बनावट दस्ताऐवज बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. शिवाय ठेवीदारांच्या ठेवी परत करताना त्यांच्या मूळ रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन उर्वरित रक्कमेचा अपहार करण्यात आल्याच्या तक्रारी ठेवीदारांकडून करण्यात येत होत्या. या संदर्भात काही संचालकांसह अवसायकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील काही जणांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं होतं. यामध्ये जळगाव शहरातील व्यावसायिक भागवत भंगाळे, संजय तोतला, तर जामनेरमधील जयश्री मणियार, राजेश लोढा, छगन झालटे आणि भुसावळ इथल्या आसिफ तेली यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2021 10:20 am

Web Title: bhaichand hirachand raisoni bhr credit scam bjp mlc from jalgaon booked bmh 90
टॅग : Crime News,Scam
Next Stories
1 बासमतीच्या लागवडीत घट
2 राज्यात मोसमी पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय
3 आठवी ते बारावीचे वर्ग  : १५ जुलैपासून सुरू करण्यास मान्यता
Just Now!
X