News Flash

आळंदीत भक्तनिवास, वारकरी प्रशिक्षण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १ मार्च रोजी उद्घाटन

रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनच्या वतीने आळंदी येथे सर्व सोयींनीयुक्त असे नवे भक्तनिवास व वारकरी सांप्रदाय प्रशिक्षण केंद्र या संकुलांची उभारणी करण्यात येत अाहे.

| February 24, 2015 02:57 am

रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाउंडेशनच्या वतीने आळंदी येथे १९०६ सालच्या फ्रुटवाले धर्मशाळेच्या जागेवर सर्व सोयींनीयुक्त असे नवे भक्तनिवास व वारकरी सांप्रदाय प्रशिक्षण केंद्र या संकुलांची उभारणी करण्यात येत असून, त्याचे उद्घाटन आणि हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
हा कार्यक्रम १ मार्च रोजी होणार आहे. यानिमित्त शिबिर, आरोग्य तपासणी, शाळांना ग्रंथालयीन पुस्तके यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १३ हजार चौरस फुटांचा प्रशस्त सभामंडप व ५ हजार आसन क्षमता या संकुलात उभारण्यात आली आहे. २ हजार चौरस फुटांचे सत्संग सभागृह आणि सर्व सुखसोयींनीयुक्त ४२ खोल्यांचे भक्तनिवास आहे. यामध्ये ३ हजार आसन क्षमतेसह ९ हजार चौरस फुटांचे प्रशस्त भोजनगृह आहे. त्याचप्रमाणे संकुलाच्या पुढील देखभालीसाठी १० प्रशस्त दुकाने बांधण्यात आली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 2:57 am

Web Title: bhakta nivas by dhariwal foundation in alandi
टॅग : Devendra Phadanvis
Next Stories
1 ‘विकास आराखडय़ासाठी राज्य शासनाकडे मुदतवाढ मागणार’
2 ब्रिटिशांच्या हस्तक्षेपाअभावी भारतीय संगीत अबाधित – गिरीश कर्नाड
3 ‘कसला आलाय बारामती पॅटर्न!’
Just Now!
X