News Flash

भारत नाटय़ संशोधन मंदिरातर्फे गद्य नाटय़ महोत्सवाचे आयोजन

हा महोत्सव २२ ते २६ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. भरत नाटय़ संस्थेने निर्मिती केलेल्या पाच नाटकांचे प्रयोग दाखवले जाणार आहेत.

| January 15, 2015 02:55 am

भारत नाटय़ संशोधन मंदिरातर्फे गद्य नाटय़ महोत्सवाचे आयोजन

भरत नाटय़ संशोधन मंदिराच्या १२१ व्या वर्धापनदिनानिमित्त गद्य नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष आनंद पानसे यांनी दिली.
त्याप्रमाणे हा महोत्सव २२ ते २६ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. भरत नाटय़ संस्थेने निर्मिती केलेल्या पाच नाटकांचे प्रयोग दाखवले जाणार आहेत. रोज एक याप्रमाणे ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’ (२२ जानेवारी), ‘फारसं बिघडत नाही’ (२३ जानेवारी), ‘मी मंत्री झालो’ (२४ जानेवारी), ‘मोरुची मावशी’(२५ जानेवारी) आणि ‘कन्यादान’ (२५ जानेवारी) नाटक सायंकाळी ७ वाजता दाखवले जाणार आहेत. या नाटकांची निर्मिती भरत नाटय़ संशोधनाने केली आहे. नाटकांच्या प्रयोगासाठी तिकीट असून त्याची विक्री १५ जानेवारीपासून नाटय़गृहमध्ये सुरु होणार आहे. तिकिटाचा दर ५०० रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 2:55 am

Web Title: bharat natya mandir drama
टॅग : Drama
Next Stories
1 कथा… तिजोरीतील सोन्याची अन् ‘लाखमोला’च्या भंगारवाल्याची!
2 अमृतांजल पूल परिसर.. द्रुतगती मार्गावरील मोठा अडथळा!
3 पीएमपीच्या ऐंशी टक्के गाडय़ा मार्गावर
Just Now!
X