05 July 2020

News Flash

भैय्यूजी महाराज यांना शिवीगाळ करून चालकास मारहाणीचा प्रयत्न

भैय्यूजी महाराज रविवारी त्यांचे स्वीय सहायक तुषार पाटील यांच्यासोबत पुण्याहून इंदूरला निघाले होते

रांजणगाव पोलिसांकडून तिघेजण ताब्यात
इंदूर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक व पारमार्थिक ट्रस्टचे संस्थापक भैय्यूजी महाराज यांना शिवीगाळ करून त्यांच्या गाडीच्या चालकास मारहाण केल्याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नगर रस्त्यावर रविवारी (८ एप्रिल) ही घटना घडली होती.
भैय्यूजी महाराज रविवारी त्यांचे स्वीय सहायक तुषार पाटील यांच्यासोबत पुण्याहून इंदूरला निघाले होते. नगर रस्त्यावर रांजणगाव बसस्थानकाजवळ एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यावेळी ट्रकमधील तीनजणांनी भैय्यूजी महाराज यांना शिवीगाळ करून त्यांच्या चालकास मारहाण केली होती. त्यानंतर भैय्यूजी महाराज, स्वीय सहायक तुषार पाटील हे चालकासोबत इंदूरला रवाना झाले. त्यानंतर सोमवारी (९ एप्रिल) भैय्यूजी महाराज यांनी दूरध्वनीवरून रांजणगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. दरम्यान भैय्यूजी महाराज यांच्या पुण्यातील अनुयायांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक डॉ. जय जाधव यांना या प्रकाराची माहिती दिली.
दरम्यान ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार रांजणगाव पोलिसांनी या प्रकरणी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 12:15 am

Web Title: bhayyuji maharaj abused at nagar road
Next Stories
1 पुण्यात ठिकठिकाणी बाँब ठेवल्याची अफवा पसरविणारा माथेफिरू पुन्हा अटकेत
2 दागिने हिसकाविणारे दोघे चोरटे जेरबंद
3 अवघ्या आठ मिनिटांत घराशेजारील ‘इनोव्हा’ गायब
Just Now!
X