28 February 2021

News Flash

श्वसनास त्रास होत असल्याने अटकेत असलेले वरवरा राव रुग्णालयात

पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल त्यांना करण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले विद्रोही कवी वरवरा राव यांना श्वसनास त्रास होत असल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राव यांना विशेष न्यायालयाने रविवारी ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणात पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना २८ ऑगस्ट रोजी छापेमारी करीत अटक केली होती. मात्र, आपल्यावर केलेली अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे सांगत यातील काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर वरवरा राव हे स्थानबद्ध होते. हैदराबाद हायकोर्टाने तीन आठवड्यांसाठी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. ही मुदत शनिवारी संपली. त्यानंतर शनिवारी रात्री पुन्हा एकदा त्यांना अटक करण्यात आली होती.

रविवारी पुणे येथील विशेष न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी सकाळी त्यांनी श्वसनास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 1:26 pm

Web Title: bhima koregaon case activist varavara rao taken to sassoon hospital after complaining of difficulties in breathing
Next Stories
1 नक्षलवाद्यांशी संबंधाप्रकरणी दिग्विजय सिंह यांची चौकशी होण्याची शक्यता
2 पुलंचे साहित्य म्हणजे संजीवनी
3 पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्वद लाखांचे सोने जप्त
Just Now!
X