News Flash

भीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे पोलीस घेणार थेट ‘एफबीआय’ची मदत

लवकरच पथक अमेरिकेला रवाना होणार

भीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे पोलीस घेणार थेट ‘एफबीआय’ची मदत

भीमा कोरगाव हिंसाचार प्रकरणी व माओवादी संघटनेशी संबध असल्याचा आरोप असलेले कवी वरवरा राव यांच्या घरून जप्त करण्यात आलेला हार्ड डिस्कचा डेटा पुन्हा मिळवण्यासाठी पुणे पोलीस आता थेट फेडरल ब्यूरो ऑफ इनव्हेस्टिगेशन (एफबीआय) या अमेरिकन तपास संस्थेची मदत घेणार आहेत. यासाठी भारतातील फॉरेन्सिक विशेषज्ञ व पोलीसांचे एक पथक लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे.

वरवरा राव यांच्या घरी पोलिसांनी छापा मारून काही हार्ड डिस्क जप्त केल्या होत्या. मात्र, यातील डेटा डिलीट करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने आता हा डेटा मिळवण्यासाठी एफबीआयची मदत घेतली जात आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी अरुण परेरा ,वर्णन गोंसालविस, सुधा भारद्वाज ,हौत्म नवलखा आणि वरवरा राव यांना २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती.

भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शिवाय, या ठिकाणी राज्यभरातून मोठ्यासंख्येने नागरिक दाखल होत असतात. मात्र, १ जानेवारी २०१८ रोजी या ठिकाणी हिंसाचार उफळला होता.

यंदा या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे व हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी १६३ जणांना नोटिसा बजाविल्या आहेत. शिवाय, संभाजी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्हा बंदी करण्यात आली आहे. याचबरोबर भीमा-कोरेगाव येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या आहेत. १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यास राज्यभरातून कार्यकर्ते येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2019 5:22 pm

Web Title: bhima koregaon violence case pune police to take help of the us based federal bureau of investigation msr 87
Next Stories
1 पुणे : ‘सीएमई’मध्ये सरावादरम्यान दोन जवानांचा मृत्यू, पाच जखमी
2 धर्माच्या नावावर भाजपाचा देशाला विभागण्याचा प्रयत्न : सचिन पायलट
3 पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या