28 September 2020

News Flash

कोरेगाव भीमा हिंसाचारातील आरोपींना प्रवेशबंदी

पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा होणार्‍या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

संग्रहित

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणाशी संबंध असणार्‍या आरोपींना पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी या संदर्भातील आदेश काढण्यात आले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरेगाव भीमा हिंसाचाराला आता एक वर्ष पूर्ण होत असून या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील बंदोबस्तात वाढण्यात आला आहे. हिंसाचारप्रकरणाशी संबंध असणार्‍या आरोपींना पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना प्रतिबाधात्मक आदेश पाठवण्यात आला आहे का ? या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. याची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

संदीप पाटील पुढे म्हणाले की, कोरेगाव भीमा येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण १० किलोमीटरचा परिसरावर सीसीटीव्हीची नजर आहे. याठिकाणी येणार्‍या प्रत्येक नागरिकांची काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा होणार्‍या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

राजकुमार बडोले म्हणाले की, भीमा कोरेगाव येथे यंदा १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणार्‍या नागरिकांची संख्या ८ ते १० लाख असणार आहे. त्या दृष्टीने सर्व सुविधा पुरवल्या जाणार असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणार्‍या प्रत्येक नागरिकाला पाणी व गाडीची सुविधा दिली जाणार आहे. तसेच नागरिकांनी सोशल मीडिया वरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 5:26 pm

Web Title: bhima koregaon violence no entry for accused in pune rural area
Next Stories
1 महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे ६ वर्षांच्या अथर्वने गमावली करंगळी
2 नववधूच्या आईला एक फोटो काढणे पडले आठ लाखात, दागिने लंपास
3 ‘गिरीश काय रे?, अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही’, पुण्यात बॅनरबाजी
Just Now!
X