पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर आणि ग्रामीण परिसरात घरफोड्या करणाऱ्या चार जणांना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण १० लाख ३९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात, २० तोळे सोन्याचे आणि २० तोळे चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या दोन्ही वेगवेगळ्या कारवाई असून किरण गुरुनाथ राठोड, भगतसिंग भादा तर दुसऱ्या कारवाईत जयंत गायकवाड उर्फ जयड्या आणि सचिन पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण राठोड आणि भगतसिंग भादा यांनी दिघी परिसरात दहशत पसरवत चिकनच्या दुकानात बळजबरी करत दुकान मालकाच्या गळ्याला कोयता लावून गल्ल्यातील पैसे घेऊन, ‘मी भोसरीचा दादा आहे माझं नाव किरण राठोड आहे मला कोणी नाडायच नाही,’ असं रोडवर मोठमोठ्याने ओरडून दहशत पसरवली होती. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार भोसरी पोलीस आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, आरोपी हे कर्नाटकला पळून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांच्या पथकातील गणेश सावंत आणि समीर रासकर यांनी डोंगराळ भागातून सापळा रचून आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. त्याच्याकडून आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
Gokhale Bridge
गोखले पुलाचे ढिसाळ नियोजन, निवृत्त अधिकाऱ्याला पालिकेच्या पायघड्या
panvel, taloja midc, pendhar village, Illegal Liquor Sales, Police Crackdown
तळोजात बीअर शॉपीमध्ये मद्य विकणाऱ्यावर कारवाई

तर, दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली विधाते आणि गोपी यांच्या पथकाने घरफोडीमधील अट्टल गुन्हेगार जयड्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत ८७ घरफोड्या केल्या असून सोने आणि चांदीचा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जयड्या हा घरफोडी करून पसार होत असताना सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. तो सचिन पवारच्या साथीने घरफोड्या करायचा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे आणि जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.