‘सध्याची तरुण पिढी इंटरनेटमुळे अत्याधुनिक बनली आहे. त्यांना कर्मकांडाकडे वळविण्यापेक्षा धर्मातील तर्काचा विचार करायला सांगा. महिलांनी बुवाबाजीच्या आहारी न जाता स्वत:च्या सक्षमीकरणाला प्राधान्य द्यावे,’ असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड.भास्करराव आव्हाड यांनी व्यक्त केले.
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तींना देण्यात येणारा ‘भूषण पुरस्कार’ वितरण सोहळा भरत नाटय़ मंदिर येथे संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी सुभाष सरपाले (व्यापार), कृष्णकुमार गोयल (उद्योग), नम्रता वागळे (पत्रकारिता), अश्विनी एकबोटे (कला) व श्रीधर फडके (संगीत) यांना ‘भूषण पुरस्कार २०१५’ प्रदान करण्यात आला.
या वेळी माधुरी मिसाळ, भानुप्रताप बर्गे, सुनील गोडबोले, राहुल सूर्यवंशी, निवृत्ती जाधव, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. मिलिंद भोई, शिरिष मोहिते आदी उपस्थित होते.