आंबेगाव तालुक्यातील कळंब (धरनमळा ) येथील मारुती कहडने यांच्या घरा जवळ लावलेल्या पिंजऱ्यात सलग चौथ्या दिवशी बिबट्याचा चार ते पाच वर्ष वयाची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे, कहडने कुटुंब गेले अनेक दिवस बिबट्याचा दहशतीखाली होते,मादी बिबट्या पकडल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.बिबट्या मादीला पकडल्यानंतर लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तिपर्यंत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी की होती.

पकडल्यानंतर सदर मादी बिबटया माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात नेण्यात आल्याची माहिती वनपरिमंडल अधिकारी सोमनाथ कुंटे यांनी दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे बिबट्याने उच्छाद मांडला होता.त्यामुळे येथील नागरिक अत्यंत भीतीच्या वातावरणात वावरत होते.गेल्या चार दिवसात दोन बछडे आणि रात्री चार ते पाच वर्षीय मादी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.हा सर्व थरार नागरिकांनी डोळ्यांनी पाहिला,मादी बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Pune police checking, gangsters gun, 2 Incidents of Gun Violence, Gun Violence Reported in pune, firing in hadapsar, firing on jangli maharaj road, firing in pune, violence in pune, pune police, crime news, marathi news,
पुणे : गुंडांच्या झाडाझडतीनंतर शहरात गोळीबाराच्या दोन घटना,जंगली महाराज रस्ता, हडपसर भागात गोळीबार
akola, after 3 months of victim death, Murder Case Registered, Akot Police Sub Inspector, murder case in akola, murder case, victim death, victim torture by police, crime news, akola news, marathi news,
पोलिसाच्या अमानुष मारहाणीत आरोपीचा मृत्यू; तीन महिन्यांनी गुन्हा दाखल
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
26 year old youth murdered in bibvewadi
पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

दरम्यान,आंबेगावं पंचायत समितीचे सभापती उषा कानडे यांनी पंधरा वर्ष्यापूर्वी असणारे अवसरी वन उद्यानातील बिबट निवारा केंद्र पुन्हा चालू करण्यात अशी मागणी केली आहे.आंबेगाव तालुक्यात घोडनदी काठी असणाऱ्या बहुतांश गावात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांना जुन्नर येथील निवारा केंद्राकडे पिंजरा मागणी करावी लागते अनेक वेळा मागणी करून देखील पिंजरा उपलब्ध होत नाही अस त्या म्हणाल्या.