18 January 2019

News Flash

प्रदूषणरहित पुण्यासाठी आणखी एक पाऊल..

सायकल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

सायकल योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नव्वद दिवस प्रायोगिक तत्त्वावर मोफत सायकल सुविधा पुरविण्याच्या स्मार्ट सिटीच्या सायकल योजनेतील दुसऱ्या टप्प्याला शुक्रवारपासून प्रारंभ झाला. प्रायोगिक तत्त्वावरील नव्वद दिवसांच्या मोफत सेवेनंतर मिळणाऱ्या प्रतिसादानुसार पुढे नाममात्र शुल्कात ही सेवा देण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनीला ओफो या कंपनीने २७५ सायकल नव्याने उपलब्ध करून दिल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात नव्वद दिवसांसाठी म्हणजे तीन महिन्यांसाठी सायकल सेवा मोफत देण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला आहे. या योजनेचे उद्घाटन शुक्रवारी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, ओफो कंपनीचे प्रांतीय व्यवस्थापक दीपक सारडा या वेळी उपस्थित होते.

‘विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी हे देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक आहेत. या योजनेला प्रतिसाद देऊन प्राणवायू आणि पर्यावरण संवर्धन करण्यास सर्व जण हातभार लावत आहेत. शहराच्या अन्य भागातही या उपक्रमाला असाच प्रतिसाद मिळेल,’ असे या वेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ठरावीक काळासाठी ओफो कंपनीच्या सायकल मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी जास्त वाढवावा, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राजेंद्र जगताप यांनी सांगितले. तर, ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाही त्यांनी इतरांचे स्मार्टफोन अ‍ॅप्लिकेशन्स वापरून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

First Published on January 13, 2018 3:07 am

Web Title: bicycle movement in pune