21 April 2019

News Flash

बोपोडीतल्या लाकूड वखारीला भीषण आग

फटाक्यांमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे

पुण्यातील बोपोडी भागात असलेल्या लाकूड वखारीला भीषण आग लागल्याने ही वखार जळून खाक झाली आहे. फटाक्यांमुळे ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लाकडाच्या वखारीला आग लागल्याची घटना घडली. लाकडाची वखार असल्याने या आगीमध्ये संपूर्ण वखार जळून खाक झाली आहे. तसेच आतापर्यंत ८ बंब आणि काही खासगी टँकर मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

पुण्यात २५ ठिकाणी आगीच्या घटना

पुण्यात बुधवारी संध्याकाळी सात वाजल्यापासून आतापर्यंत एकूण २५ हून अधिक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. शहराच्या विविध भागात गुरुवार पेठ, रास्ता पेठ, सदाशिव पेठ, कर्वे पुतळा, बावधान, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, सिंध कॉलनी, वानवडी, उंड्री, विमाननगर, खराडी येथे झाड, घर, गाडी, गवताला अशा आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीमधे कोठेही जखमी किंवा जिवितहानी नाही.

First Published on November 8, 2018 9:17 am

Web Title: big fire at wood godown in bopodi pune