News Flash

मिळकतकर ऑनलाइन भरण्याला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

११० कोटी ६१ लाख रुपयांचा मिळकतकर महापालिके च्या तिजोरीत जमा 

११० कोटी ६१ लाख रुपयांचा मिळकतकर महापालिके च्या तिजोरीत जमा 

पुणे : शहरातील १ लाख १८ हजार ५६४ मिळकतधारकांनी ११० कोटी ६१ लाख रुपयांचा मिळकतकर महापालिके च्या तिजोरीत जमा के ला आहे. त्यापैकी १ लाख १६ हजार ७८ नागरिकांनी ऑनलाइन आणि डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे १०७ कोटी ५७ लाख रुपयांचा भरणा के ला आहे. त्यामुळे ऑनलाइन कर भरणा सुविधेला पुणेकरांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, रोख किं वा धनादेशाद्वारे मिळकतकर भरण्याबाबत मिळकधारकांकडून सातत्याने विचारणा होत असल्यामुळे आजपासून (११ मे) नागरी सुविधा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महापालिका हद्दीतील एकू ण मिळकतींची संख्या १० लाख ५७ हजार ७१६ आहे. महापालिके च्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून सन २०२०-२१ या वर्षांसाठीचे उत्पन्न निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षांसाठीची ही मागणी एक हजार ५०० कोटी रुपये आहे.

शहरातील एकू ण मिळकतींपैकी जुन्या हद्दीमध्ये ९ लाख १३ हजार ८५५ मिळकती असून नव्याने समाविष्ट गावातील मिळकतींची संख्या १ लाख ४३ हजार ८६१ आहे. जुन्या हद्दीतील मिळकतींकडून १ हजार ३६५ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. तर नव्याने समाविष्ट गावातील मिळकतींकडून १४६ कोटी ५१ लाख रुपये एवढी चालू आर्थिक वर्षांतील मागणी आहे.

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महापालिके ने यंदा मिळकतकर देयकांची छपाई आणि वितरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळकतकराची देयके  ऑनलाइन पद्धतीने मिळकतधारकांना पाठविण्यात आली आहेत. त्यानुसार एक एप्रिल ते ७ मे या कालावधीत शहरातील दहा लाखाहून अधिक मिळकतधारकांपैकी एक लाख १८ हजार ५६४ मिळकतधारकांनी ११० कोटी ६१ लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा के ला आहे. यामध्ये १ लाख १६ हजार ७८ मिळकधारकांनी ऑनलाइन किं वा डिजिल प्रणालीद्वारे १०७ कोटी ५७ लाख रुपयांचा करभरणा के ला आहे. उर्वरित ५६२ मिळकतधारकांनी २ कोटी ७२ लाख रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे जमा के ली आहे. तर ३७९ मिळकतधारकांनी ३१ लाख रुपये रोख स्वरूपात जमा केले आहेत.

कर भरण्यासाठी विविध ऑनलाइन पर्याय महापालिके ने दिले असले तरी आणि ऑनलाइन कार्यप्रणाली अस्तित्वात असली तरी नागरिकांकडून रोख रक्कम किं वा धनादेशाद्वारे मिळकतकर भरण्याबाबत महापालिके कडे सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये महापालिके ने नागरी सुविधा के ंद्रांवर मिळकत कराची माहिती देण्यासाठी आणि मदतीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांची नेमणूक के ली आहे. ही नागरी के ंद्र सोमवारपासून सुरू करण्यात आली आहेत. ही के ंद्रे सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीत सुरू राहतील, अशी माहिती कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली. के ंद्रांवर गर्दी होणार नाही किं वा नागरिकांना फार काळ थांबावे लागणार नाही, याची दक्षता घेऊन ती सुरू करण्याची सूचना आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

ऑनलाइन पर्याय

मिळकतकराचा भरणा करण्याची सुविधा नेटबँकिं ग, क्रे डीट कार्ड, डेबिट कार्ड, भारत क्यूआर कोड, यूपीआय- गुगल पे, यूपीआय- फोन पे, पोस्ट डेबिट कार्ड, पॉस क्रे डीट कार्ड, मोबाइल वॉलेट, पेटीएम, अ‍ॅमेझॉन पे, एनईएफटी-आरटीजीएस आदी ऑनलाइन पर्यायाद्वारे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 1:28 am

Web Title: big response from pune residents to file income tax online zws 70
Next Stories
1 लघु उद्योगांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा
2 आठवडाभरात पुण्यातून परराज्यात २३ रेल्वे
3 भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत प्रथमच ऑनलाइन अध्यापन
Just Now!
X