News Flash

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

अटक करण्यात आलेल्या इसमाकडे लष्कराविषयीची माहिती असल्याचे पुरावे सापडले आहेत

पुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.  बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

बिहार पोलिसांनी सोमवारी पुलवामा हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा येथे ही कारवाई करण्यात आली आहे. काही गुप्तचर संस्थांनी मिळालेल्या माहितीनंतर बिहार पोलिसांनी ही कारवाई सोमवारी केली आहे. या दोघांचीही पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. दरम्यान आजही बिहार एटीएसने पुण्यातून एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर केल्यानंतर आता बिहार पोलीस त्याला बिहारला घेऊन गेले आहेत. तिथे त्याची चौकशी केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 6:08 pm

Web Title: bihar ats arrested one person from pune regarding pulwama attack
Next Stories
1 पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; निवडणूक विभागाच्या पथकाची कारवाई
2 काँग्रेसकडे उर्मिला मातोंडकरच्या प्रवेशासाठी वेळ, पण माझ्यासाठी नाही – प्रविण गायकवाड
3 निवडणुकीत ज्यानं पाडलं, आता त्याचाच प्रचार करण्याची वेळ आली : सत्यजीत तांबे
Just Now!
X