पुण्यातील बिबवेवाडी परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराचा आठ ते १० जणांनी सपासप वार करून हत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर हत्या झालेल्या गुन्हेगाराच्या अंत्यविधीला जवळपास १२५ हून अधिक जणांनी दुचाकीवरून रॅली काढली. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचा पोलीस शोध घेत आहेत. करोना विषाणूंमुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता अंत्यविधीसाठी केवळ २५ जणांना परवानगी देण्यात आली असताना पुण्यात १२५ हून अधिक जणांची दुचाकीवरून रॅली काढल्याने आश्चर्य व्यक्त आहे.

माधव वाघाटे असं हत्या झालेल्या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. सावन गवळी, पवन गवळी, गोपाळ ढावरे, सुनील घाटे, शुभम तनपुरे सर्व आरोपी बिबवेवाडी परिसरात राहणारे आहेत.

Gold Silver Price
Gold-Silver Price on 9 April 2024: गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, पाहा आजचा भाव
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
Gold Silver Price
Gold-Silver Price on 1 April 2024: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात तेजी, वाचा आजचे दर
pune farmers marathi news, pune holi farmers marathi news, farmers disappointed on holi marathi news
शेतकऱ्यांची निराशा! होळीच्या मुहूर्तावर बेदाणा, गुळाच्या दराचे काय झाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास माधव वाघाटे याला फोन भांडण झालं असल्याचा फोन आला. त्यावर तो बिबवेवाडी चौकी परिसरातील ओटा मार्केट परिसरात पोहोचला. तेव्हा तिथे अगोदरचा दबा धरून आठ ते १० जण बसले होते. माधव वाघाटेला काही समजण्याच्या आत त्याच्यावर ट्युब, लोखंडी रॉड आणि चाकूने सपासप वार करण्यात आले. यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि जागीच मृत्यू झाला.

यानंतर तर काही तासात गोपाळ ढावरे आणि शुभम तनपुरे यांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरु आहे.
या घटनेनंतर मयत माधव वाघाटे यांच्या अंत्ययात्रेला परिसरातील नागरिक आणि त्याचा मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. त्याच्या घरापासून ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत तब्बल १२५ हून अधिक जण दुचाकीवरून रॅली काढत सहभागी झाले. या घटनेची माहिती परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून सहभागी झालेल्या सर्वावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.