27 February 2021

News Flash

मैत्रिणीला सोडून परत येताना तरुणाचा अपघाती मृत्यू, हेल्मेट घातले असते तर…

मंगळवारी आदितीचा हिंजवडीमधील एका कंपनीत इंटरव्ह्यू होता. यासाठी अमन तिला दुचाकीवरून सोडण्यासाठी गेला.

मैत्रिणीला सोडून परत येत असताना तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी येथे मंगळवारी सकाळी घडली. अमन पांडे असे या तरुणाचे नाव असून तो मैत्रीण आदिती जयस्वालला इंटरव्ह्यूसाठी कंपनीत सोडायला गेला होता. दुचाकी चालवताना अमनने हेल्मेट घातले नव्हते, अशी माहितीही समोर आली असून अमनने हेल्मेट घातले असते तर हा प्रसंग ओढावला नसता, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन पांडे आणि आदिती जयस्वाल हे मित्र होते. मंगळवारी आदितीचा हिंजवडीमधील एका कंपनीत इंटरव्ह्यू होता. यासाठी अमन तिला दुचाकीवरून सोडण्यासाठी गेला. आदितीला कंपनीच्या गेटवर सोडून तो परत निघाला. अमन हा १४० किमी प्रतितास या वेगाने दुचाकी चालवत होता आणि त्याने हेल्मेटही घातले नव्हते. विप्रो सर्कलच्या दिशेने येत असताना वळणावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो थेट दुभाजक ओलांडून दुचाकीसह विरुद्ध दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर पडला. याच दरम्यान तिथून एक कार जात होती. त्या कारखाली सापडून अमनचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 3:22 pm

Web Title: biker dies in accident in hinjewadi he didnt wear helmet
Next Stories
1 पुण्यातील दापोडीत ७ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या
2 शनिवारवाडयाचा उघडलेला दिल्ली दरवाजा बघण्यासाठी पुणेकरांची गर्दी
3 पत्नीच्या फेसबुक अकाऊंटवरुन त्याने मित्राला मेसेज केला आणि…
Just Now!
X