26 September 2020

News Flash

वाढदिवसाचा केक तलवारीने कापला, बर्थ डे बॉयवर गुन्हा

केक कापतानाचे फोटो सोशल मीडियावर

संग्रहित छायाचित्र (प्रतीकात्मक)

पिंपरीतील खेड मांजरेवाडी भागात एका तरुणाला वाढदिवस साजरा करणे चांगलेच महागात पडले आहे. सैराट या सिनेमात दाखवल्याप्रमाणे ओमकार टाकळकर या २२ वर्षांच्या तरुणाने वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापला. याचे फोटो त्याच्या मित्रांनी मोबाइलमध्ये काढले. त्यानंतर हे फोटो व्हॉट्स अॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल झाले. खेड मांजरेवाडीचे पोलीस पाटील प्रमोद मांजरे यांनीही हे फोटो पाहिले.

तलवारीने केक कापतानाचे फोटो पाहिल्यानंतर पोलीस पाटील प्रमोद मांजरे यांनी खेड पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार नोंदवली. ओमकार टाकळकर, नंदकुमार मांजरे, अक्षय मांजरे, गणपत मैराळे, स्वप्नील मांजरे, बाळासाहेब मांजरे या तरुणांवर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही अशीही माहिती समोर येते आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक लोणीकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 12:40 pm

Web Title: birthday cake cut off with sword case filed on birth day boy
Next Stories
1 पुण्यातील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले, एक आरोपी अटकेत
2 डी. एस. कुलकर्णींची प्रकृती उत्तम
3 आर्थिक निकषांवरील आरक्षणावर थयथयाट करणाऱ्या पवारांची अडीच वर्षांत भूमिका कशी बदलली?
Just Now!
X