News Flash

पुणे महापालिकेच्या प्रभाग १ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी

ऐश्वर्या जाधव यांनी आघाडीच्या रेणुका चलवादींचा पराभव केला

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ अच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी झाल्या आहेत. त्यांनी आघाडीच्या रेणुका चलवादी यांचा पराभव केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये निवडणुकी प्रभाग क्रमांक १ मधून भाजपाच्या किरण जठार विजयी झाल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाकडे त्यांनी जे जात प्रमाणपत्र दाखल केले होते ते अवैध असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते अवैध असल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर प्रभाग क्रमांक १ अची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.

या निवडणुकीत आघाडीकडून रेणुका चलवादी, भाजपाकडून ऐश्वर्या जाधव, वंचित आघाडीच्या रोहिणी टेकाळे या उमेदवार होत्या. २२. ५ टक्के इतके मतदान झाले. आज सकाळी मतमोजणी झाली. सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये रेणुका चलवादी आणि ऐश्वर्या जाधव यांच्यात स्पर्धा पाहण्यास मिळाली. मात्र महत्त्वाची बाब ही की पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत ऐश्वर्या जाधवच आघाडीवर होता. ऐश्वर्या जाधव या ३ हजारहून जास्त मतांनी विजयी झाल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 2:16 pm

Web Title: bjp candidate aishwarya jadhav won by election in pune prabhag no 1 scj 81
Next Stories
1 पुणे : Ola बुक करुन ड्रायव्हरचा खून, कार चोरीला
2 मोसमी पाऊस दुष्काळी भागांत
3 पदवीप्रदान सोहळ्यासाठी हातमागाचे कापड वापरा!
Just Now!
X