News Flash

पिंपरीत आजी-माजी नगरसेवकांचा भाजपकडे ओघ कायम

पिंपरी महापालिकेच्या राजकारणात ‘आयाराम-गयाराम’चे सत्र शेवटच्या क्षणापर्यंत सुरू आहे.

पिंपळे गुरव येथील कार्यकर्ते श्याम जगताप यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

भाजप शहराध्यक्षांचे चुलत बंधू मात्र राष्ट्रवादीत

पिंपरी महापालिकेच्या राजकारणात ‘आयाराम-गयाराम’चे सत्र शेवटच्या क्षणापर्यंत सुरू आहे. गेल्या काही दिवसात अनेक आजी-माजी नगरसेवकांनी भाजपचा रस्ता धरला आहे. या घडामोडी चालू असतानाच भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे चुलत बंधू राष्ट्रवादीत दाखल झाल्याने तर्कवितर्काना उधाण आले आहे.

भाजपमध्ये जाणार, असे भाकीत ज्या नगरसेवकांच्या बाबतीत करण्यात येत होते, त्यांनी एकेक करत नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या सीमा सावळे व आशा शेंडगे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ, नगरसेवक राजेंद्र जगताप, शत्रुघ्न काटे, विनायक गायकवाड, नवनाथ जगताप, बाळासाहेब तरस, माया बारणे भाजपमध्ये दाखल झाले. क्रीडा समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादीचे नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा दिला. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे नगरसेवक जालींदर िशदे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. आमदार जगताप समर्थक महापौर धराडे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळे गुरव येथील श्याम जगताप यांनीही अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भाजपमध्ये नव्या-जुन्यांचा वाद कायम

भाजपच्या १२८ पैकी ९० उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. काही जागा रपिंाइंसाठी सोडण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, पक्षातील नव्या-जुन्यांच्या वादात काही प्रभागातील उमेदवार ठरवता आलेले नाही. या दोन्हींचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 3:06 am

Web Title: bjp candidate going in ncp
Next Stories
1 गळती दुरुस्तीला मुहूर्त कधी?
2 ‘पुण्याच्या वारसा स्थळांसाठी वेगळी संस्था हवी’
3 बाजारभेट : फुलांच्या बाजारपेठेचा व्यावहारिक गंध!
Just Now!
X