मुंडे गटाचे पूर्ण वर्चस्व

Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
Akhilesh Mishra
आयर्लंडमधील भारताचे राजदूत अखिलेश मिश्रांना पदावरुन हटवा; काँग्रेसने का घेतली आक्रमक भूमिका?
Alibaug, Rahul Narvekar
अलिबागचे नामकरण करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात तक्रार दाखल
PM Narendra Modi And Govindam
‘कोणतंही हुकूमशाही सरकार फार काळ टिकू शकलं नाही, त्यामुळे भाजपाच्याही नशिबात तेच आहे’; कम्युनिस्टांचा दावा

 

गेले अनेक दिवस चर्चेत असलेली भारतीय जनता पक्षाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारिणीत २२७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीवर पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गटाचे पूर्ण वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. कार्यकारिणीत आठ उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, आठ चिटणीस तसेच १०१ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर शहर कार्यकारिणीची चर्चा गेले अनेक दिवस सुरू होती. ही कार्यकारिणी बुधवारी जाहीर करण्यात आली. घोषित कार्यकारिणीतील महत्त्वाची पदे मुंडे गटाकडे असून अनेक नगरसेवकांना महत्त्वाची पदे मिळाली आहेत. नगरसेविका मुक्ता टिळक, नगरसेवक सुनील कांबळे, दत्ता खाडे, तसेच श्याम सातपुते, संदीप खर्डेकर, प्रकाश मंत्री, आबा तुपे, डॉ. संदीप बुटाला यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या सरचिटणीस पदावर चारजणांची नियुक्ती झाली असून त्यात मुरलीधर मोहोळ (संघटन), दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर आणि गणेश घोष यांचा समावेश आहे. मुकेश गवळी, विनोद वस्ते, प्रभावती मटाले, महेंद्र गलांडे, श्रीकांत नाझीरकर, राजू शेंडगे, विश्वास आहेर आणि गिरीश खत्री यांच्याकडे चिटणीसपद देण्यात आले असून विनायक आंबेकर यांच्याकडे कोषाध्यक्षपद देण्यात आले आहे.  संजय मयेकर यांच्याकडे प्रचार प्रसिद्धीची जबाबदारी देण्यात आली असून कार्यालय प्रमुख म्हणून उदय जोशी यांची, बूथ रचना संयोजक म्हणून गोपाळ चिंतल यांची आणि सहसंयोजक म्हणून सुहास कुलकर्णी यांची नियुक्ती नव्या कार्यकारिणीत करण्यात आली आहे. पुण्यातील केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार असे १२ जण या कार्यकारिणीत कायम निमंत्रित सदस्य म्हणून राहतील. तसेच अन्य ३५ जण निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

विविध आघाडय़ांचे अध्यक्षही नियुक्त करण्यात आले असून महिला मोर्चा अध्यक्षपदी शशिकला मेंगडे, युवा मोर्चा अध्यक्षपदी दीपक पोटे, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षपदी डॉ. भरत वैरागे, इतर मागासवर्गीय आघाडी अध्यक्षपदी अशोक मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भटके विमुक्त आघाडी संयोजकपदी दीपक नागपुरे यांची तसेच सहकार आघाडी संयोजकपदी सुरेश घाटे यांची, व्यापारी आघाडी संयोजकपदी उमेश चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.