News Flash

वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून झाली भाजपा नगरसेवकाची हत्या

दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादाच्या रागातून मावसभावानेच हत्या केल्याचा संशय

वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून झाली भाजपा नगरसेवकाची हत्या

आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून त्याच्याच मावसभावाने केला असल्याची तक्रार कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरूनच मंगळवारी रात्री उशिरा संशयित अजय मेटकरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून हत्या झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तक्रारदार घोलप आणि ज्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आले हे तो अजय हे दोघेही बालाजी यांचे मावस भाऊ आहेत.

दोन महिन्यांपूर्वी बालाजी हे देहू फाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाला गेले होते. त्यावेळी अजय मेटकरी याने दारूच्या नशेत बालाजी यांना शिवीगाळ करून त्यांच्या बरोबर झटापट केली होती. अजय हा बालाजी यांचा मावस भाऊ आहे. भांडणानंतर बघून घेईल अशी धमकीही त्याने दिली होती. त्यामुळे त्यानेच भांडणाचा राग मनात धरून अजयने बालाजी यांची हत्या केल्याची तक्रार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे.

विशेष म्हणजे भांडण झाल्यानंतर हे प्रकरण दिघी पोलिसांपर्यंत गेले होते. याप्रकरणी दिघी पोलिसात मयत नगरसेवक बालाजी यांनी तक्रारही केली होती. हा वाद पोलिसांत गेल्यानंतर दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली होती. दिघी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असती तर कदाचित आज नगरसेवक बालाजी हे जिवंत असते. त्यामुळे हा पोलिसांचा हलगर्जीपणाचा तर बळी नाही ना अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

काल म्हणजेच मंगळवारी (२७ जून २०१८) दुपारी साडेचार वाजता बालाजी कांबळे हे दुचाकीवरून आळंदी-भोसरी रसत्यावरून जात असताना कारमधून आलेल्या अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. वडमुखवाडी येथे झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात हल्लेखोरांनी बालाजी यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दिघी पोलीस दाखल झाले. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते आणि बालाजी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती आळंदीसह पिंपरी-चिंचवड परिसरात मिळताच त्यांच्या कार्यकर्त्यानी गर्दी केली होती. त्यामुळे काहीकाळ रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. मयत नगरसेवक हे छोटे बांधकाम व्यवसायिक होते, ते पाहील्यांदाच नगरसेवक म्हणून भाजपाकडून निवडून आले होते. त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी तक्रारीनंतर अद्याप अजय मेटकरीला अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलिस या प्रकरणातील सर्व शक्यता पडताळून पाहत असल्याच समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2018 10:05 am

Web Title: bjp cooperator balaji kamble murdered by his own brother in pune
Next Stories
1 गुड न्यूज! पर्यटकांची प्रतीक्षा संपली, लोणावळ्याचा भुशी डॅम ओव्हरफ्लो
2 बंदीनंतर संकलित प्लास्टिकचे करायचे काय?
3 पिंपरी पालिकेत सभा तहकुबींचा ‘नाद खुळा’