News Flash

“४० वर्ष सेवा करतोय हे आमच्या कुटुंबाचं चुकलं का?,” पुण्यात भाजपा नगरसेवकाचे होर्डिंग ठरतोय चर्चेचा विषय

"सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे आमचं चुकलं का?"

पुण्यातील एक होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या होर्डिंगमध्ये भाजपा नगरसेवकाने आपली नाराजी जाहीर केली आहे. ४० वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपाची सेवा करतंय…हे आमचं चुकलं का? सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे आमचं चुकलं का? अशी विचारणा नगरसेवकाच्या वतीने करण्यात आली आहे.

सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या वतीने हे होर्डिंग लावत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. नुकतीच महानगरपालिकेची स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात त्यांचं नाव अग्रेसर होतं, मात्र त्यांच नाव डावलून इतरांना अध्यक्षपद देण्यात आल्याने ते दुखावले गेले होते. यामुळेच त्यांच्या समर्थकांनी शहरभर अशा आशयाचे फलक लावून भाजपशी निष्ठावान राहूनदेखील डावलल जात असल्याने उघड नाराजी व्यक्त केल्याचं चित्र आहे. याचे पडसाद येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नसून फलकाची स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 3:00 pm

Web Title: bjp corporator ravi landge supporters banner in pune kjp 91 sgy 87
Next Stories
1 सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना भारतरत्न देण्याचा ठराव पुणे महानगरपालिकेकडून मंजूर
2 मराठवाडा, विदर्भात गारपिटीचा इशारा
3 स्वत:च्याच चुकीचा शासनाला आर्थिक फटका
Just Now!
X