News Flash

अजित पवार मुलगा सोडला तर इतर कोणाचंच कौतुक करत नाहीत – गिरीश बापट

"अजित पवार खूपच वैतागलेले आहेत"

अजित पवार मुलाचं सोडून कोणाचंच कौतुक करत नाहीत असा टोला खासदार गिरीश बापट यांनी राष्ट्रवादी नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला आहे. गिरीश बापट पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगतापसह कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार गिरीश बापट यांनी यावेळी सांगितलं की, “विरोधक वैतागले आहेत, त्यात दादा तर खूपच वैतागलेले आहेत. शेवटी इतकी वर्ष सत्तेत राहण्याची सवय लागली, त्यांना आदर्श विरोधी पक्ष म्हणून काम करता येत नाही. कसं काम करायचं ते आमच्याकडून शिकावं. म्हणून मी व्यक्तिगत दादा असं म्हणून बोलणार नाही. राजकारणात काही पथ्य पाळलेली आहेत”.

“पण ते विरोधी पक्षातील आहेत. त्यांनी आम्हाला आमच्या चुका दाखवल्यास त्याचं स्वागत करेन. त्यांनी सूचना देणं याचंदेखील स्वागत करेन. पण, प्रश्नही समजून घेतले पाहिजेत. जे तुम्हाला १५-२० वर्षात करता आलं नाही, ते आम्ही १५-२० महिन्यात सुरू करून दाखवलं. याचं त्यांनी कौतुक करायला हवं. मात्र, अजित पवार यांच्यासारखा माणूस मुलाचं सोडून कोणाचंच कौतुक करणार नाहीत. त्यामुळे अवघड आहे,” असा टोला गिरीश बापट यांनी यावेळी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 6:47 pm

Web Title: bjp girish bapat ncp ajit pawar pune sgy 87
Next Stories
1 आठ कात्र्यांनी हेअर कट करणारा हा अवलिया तुम्हाला ठाऊक आहे ?
2 भाजपा उदयनराजेंचा पराभव करण्याची शक्यता : मराठा क्रांती ठोक मोर्चा
3 पुणे : पिस्तुल विकणाऱ्या आरोपीसह खरेदी करणारा पोलिसांच्या जाळ्यात
Just Now!
X