News Flash

“बायडन हे तर पूर्वीचे भिडे, ते पुण्यातच होते”, गिरीश बापटांची टोलेबाजी

पुण्यातील कार्यक्रमात गिरीश बापटांचं भाषण

अटल संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना देण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. गिरीश बापट यांनी यावेळी भाषण करताना जोरदार टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी अनेक किस्से सांगितले.

खासदार गिरीश बापट भाषण करताना म्हणाले की “जगाच्या पाठीवर कुठे काही होऊद्या आमच्या पुण्याचे लोक इतके हुशार आहेत की, त्या व्यक्तीचा आणि पुण्याचं कनेक्शन कसे हे लगेच जोडतात.”

“अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाली. जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाले. तर लगेच एका पुण्याच्या व्यक्तीने कनेक्शन जोडले की राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पुण्याचे पूर्वीचे भिडे होते. अहो इंदिरा गांधी पुण्याच्या हुजुरपागा शाळेत शिकल्या आणि बरं का देवेंद्र तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले कारण तुमचे काका पुण्यात होते. म्हणजे पुणेकर हुशार आहेत, सगळं करून पुन्हा पुण्याशी नातं येतं,” असं म्हणताच सभागृहात एकच पिकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 10:01 am

Web Title: bjp girish bapat on us elect president joe biden in pune sgy 87
Next Stories
1 रुपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी
2 करोना संशोधनाबाबत जागतिक स्तरावर देश पिछाडीवर
3 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी
Just Now!
X