खासदार वंदना चव्हाण यांचा आरोप

पुणे : शहराची स्मार्ट सिटीतील देशपातळीवरील मानांकनात भारतीय जनता पक्षाच्या नाकर्तेपणामुळेच घसरण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे महापालिके त स्पष्ट बहुमत असतानाही स्मार्ट सिटी योजनेला भाजप पदाधिकाऱ्यांना गती देता आली नाही. त्यामुळे या अपयशाचे खापर भाजपने प्रशासनावर फोडू नये, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी के ला.

भाजपचे पदाधिकारी के वळ निविदांमध्ये गुंतले आहेत. के ंद्रात आणि महापालिके त भाजपची सत्ता आहे. शहर विकासाच्या दृष्टीने नव्या विकास प्रकल्पांची मांडणी आणि अंमलबजावणी भाजपला करता आलेली नाही, असे अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

२८ वा क्रमांक तरी कसा आला ?

स्मार्ट सिटी सर्वेक्षणात शहराचे मानांकन २८ व्या स्थानी आहे. मुळातच या योजनेत औंध, बाणेर, बालेवाडी हा फक्त एक प्रभाग स्मार्ट होणार होता, ज्यावर पाच वर्षांत ३ हजार कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित होते. तर उर्वरित शहरासाठी ९०० कोटी रुपये खर्च करून पीएमपीचे सक्षमीकरण, समान पाणीपुरवठा, पाण्याचे मीटर, शून्य टक्के  पाणीगळती आदी उद्दिष्टं ठेवण्यात आली होती. पाच वर्षांत यातील काय झाले, याचे पुणेकर साक्षीदार आहेत. पाच वर्षांनंतर देशपातळीवरील मानांकनात पुणे २८ व्या स्थानी असेल तर पुण्यापेक्षा खाली क्रमांक लागलेल्या उर्वरित ७२ शहरांची काय अवस्था असेल, याची कल्पना न के लेली बरी, अशी टीका सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली.