28 November 2020

News Flash

“मुख्यमंत्र्यांना बॉलिवूड बाहेर जाणार नाही याची काळजी तर सुपुत्राला बार आणि पबची”

आशिष शेलारांची घणाघाती टीका

“राज्य सरकार सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. त्यांना कोणाचेही देणेघेणे नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त बॉलीवूड मुंबईच्या बाहेर जाणार नाही याची काळजी आहे, तर पुत्राला पब आणि बारची चिंता आहे. बॉलिवूड मुंबईतून बाहेर जावं असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. रेस्तराँ आणि बारची वेळ वाढवयाची मागणी कोणीही केली नव्हती तरी त्यांची वेळ वाढवण्यात आली, सरकार या दोनच गोष्टींची काळजी करत आहे,” असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला.

पुण्यात शेलार पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. “पब बार उघडण्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी चुकीची नाही. नियम घालून ते जर उघडलं जाऊ शकतं. तर मंदिरं नियम घालून का नाही मंदिरं उघडली गेली नाही. राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात सरकारने आमच्याशी चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे. चर्चा केल्यानंतर भाजपची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू. मात्र करोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. भाजपशी आधी चर्चा करावी आणि मग शाळांच्या संदर्भात आंदोलन करायचं की नाही ते ठरवू. जर आमची सत्ता असती तर आम्ही सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला असता. मात्र हे सरकार असे काही करताना दिसत नाही,” असंही शेलार यावेळी म्हणाले.

… त्या वक्तव्याचा राजकीय संबंध नाही

“मी काल मुंबईत केलेल्या वक्तव्याचा राजकीय कोणताही संबंध नाही. ज्ञानेश महारावांनी केलेल्या वक्तव्यावरती ती टिप्पणी होती. मी मुख्यमंत्रीपदाच्या क्षमतेचा कार्यकर्ता नाही. आमचं ज्या वेळेस सरकार येईल त्यावेळेस मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसचं असतील आणि फक्त मराठा समाजातीलचं स्त्री नव्हे तर सर्व समाजातील स्त्रीला हे सर्वोच्च स्थान मिळायला हवं ही माझी भूमिका आहे,” असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं.

राज्यपालांना अल्टीमेटम?

राज्य सरकारने जी नावे राज्यपालांना दिली आहेत. त्यासाठी २१ नोव्हेंबर पर्यंतची मुदत होती. मात्र राज्यपालांना अल्टीमेटम देणे ही कुठली पद्धत आहे. असा अल्टीमेटम देण्याच्या मनोवृत्तीचे हे कसं काय प्रदर्शन करतात. राज्यपालांना दिलेला अल्टीमेटम आम्हाला मान्य नाही. राज्यपाल त्याला जुमानतील असेही वाटत नसल्याचे ते म्हणाले.

… तर चौकशी करा

“देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महावितरणनं चांगल काम केले आहे. वाढलेली थकबाकी ही शेतकऱ्यांना दिलेल्या थकबाकीची मुदत दिल्याने वाढली आहे. शेतकऱ्यांची काळजी या सरकारला नसेल, तर त्याची चौकशी करावी. आम्ही तयार आहोत. मात्र महाविकास आघाडीतल्या भांडणामुळे सर्वसामान्यांच मात्र नुकसान व्हायला नको,” असंही शेलार यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 2:57 pm

Web Title: bjp leader ashish shelar criticize cm uddhav thackeray aditya thackeray bar pub film city school opening vidhan parishad names svk 88 jud 87
Next Stories
1 … त्यावेळी अमित शाहंच्या सांगण्यावरून मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली होती : चंद्रकांत पाटील
2 चंद्रकांत पाटील म्हणतात, “सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही…”
3 १८ हजार विद्यार्थ्यांना अनुपस्थित शेरा
Just Now!
X