28 November 2020

News Flash

चंद्रकांत पाटील म्हणतात, “सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही…”

पाहा काय म्हणाले पाटील

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं असं मत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेदेखील उपस्थित होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, यावरून भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

“इतिहासात अनेक कर्तुत्वान महिला होऊन गेल्या. एका पुस्तकाच्या उद्घाटनप्रसंगी त्यातला दाखल देत आशिष शेलारांनी मराठा महिलेला मुख्यमंत्री करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्या पुस्तकाचा संदर्भ देताना त्यांचं ते वक्तव्य होतं. सुप्रिया सुळेंना आम्ही पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते वक्तव्य आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मराठा महिला, भाजपाच्या मराठा महिला आणखी कोणाबाबत नाही. त्या पुस्तकातल्या बाबींशी त्या वक्तव्याचा संदर्भ आहे. सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं का नाही करायचं हे त्यांनीच ठरवायचं असल्याचंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते शेलार?

पत्रकार विजय चोरमारे यांच्या ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’ या पुस्तकाचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार आणि पत्रकार ज्ञानेश महाराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीचंही शंभर टक्के समर्थन असू शकतं. शरद पवार हे मोठ्या मनाचे मोठे नेते आहेत. मोठ्या पदावर तर बरीच लोकं बसतात, पण मोठ्या मनाने मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्ती या महाराष्ट्रात खूप कमी आहेत, मला कुणाशी तुलना करायची नाही,” असं शेलाय यावेळी म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 12:46 pm

Web Title: bjp leader chandrakant patil on ncp leader supriya sule chief minister of maharashtra sharad pawar ashish shelar comment svk 88 jud 87
Next Stories
1 १८ हजार विद्यार्थ्यांना अनुपस्थित शेरा
2 १८ हजार विद्यार्थ्यांना अनुपस्थित शेरा
3 मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस
Just Now!
X