04 March 2021

News Flash

मग शरद पवारांना आम्ही ‘शपा’ म्हणायचं का? पण ही आमची… : चंद्रकांत पाटील

हे गोंधळलेलं सरकार, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

“वर्षभर खुर्चीसाठी भांडायचं. सकाळी भाडायचं आणि दुपारी आपण भांडलो सरकार पडेल, मग भाजपा येईल असं म्हणून संध्याकाळी पुन्हा भाxडण्यासाठी आणि सरकार चालवण्याचा प्रयत्न वर्षभर झाला. यात सामान्य माणूस भरडला. हे गोंधळलेलं सरकार असल्याचं स्वरूप समोर आलं,” असं भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच चंपा, टरबूज्या असं म्हटलं जाऊ नये. आम्ही देखील मर्यादा पाळतो. आम्ही त्या पद्धतीने बोलू शकतो. उद्धव ठाकरे ना उठा म्हणायचे का, जयंत पाटील यांना जपा म्हणायचे का? शरद पवार यांना शपा म्हणायचे का? पण आमची ही संस्कृती नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते.

१३ महिन्यांपूर्वी निवडणुकी पूर्वी असलेली युती स्वाभाविकपणे अस्तित्वात यायला हवी होती. परंतु ज्यांना नाकारलं होतं ते सत्तेत आले. अकृत्रिमपणे निर्माण झालेल्या सरकारला १ वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षभरात खुर्चीसाठी वाटेल तो अपमान सहन करणं, पण भाजप सत्तेत येईल या भीतीने पुन्हा एकत्र येणं असे प्रकार घडले आहेत. हे संपूर्णपणे गोंधळलेले सरकार आहे. या वर्षभरात अनेक भ्रष्टाचार झाले. कोरोनातही भ्रष्टाचार झाले. प्रत्येक भ्रष्टाचार बाहेर येईल. त्यांचे वाभाडे निघतील म्हणून हे सरकार अधिवेशन घाययला घाबरत असल्याचा आरोप चंद्रकात पाटील यांनी केला. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी अधिवेशन घेऊन दाखवाव, असंही ते म्हणालं.

“सध्या शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणतं आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणतं होणार नाही. तोच गोंधळ आता दहावीच्या परीक्षेवरून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे,” असं त्यांनी नमूद केलं. कर्जमाफी केली, तिदेखील व्यवस्थित झालेली नाही, शिक्षण क्षेत्रात ही चांगले काम नाही, शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम असल्याचं पाटील म्हणाले. “या सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसानभरपाई मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. या सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळून दिले होते. पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आलं नाही. शिक्षणातलं आरक्षण यांनी आता रद्द केलं,” असं पाटील यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:12 pm

Web Title: bjp leader chandrakant patil pune election commented on sharad pawar pm narendra modi supriya sule devendra fadnavis svk 88 jud 87
Next Stories
1 …हे राज्य सरकारचे यश – सुप्रिया सुळे
2 तब्बल २४० मराठी चित्रपट दोन वर्षांपासून अनुदानासाठी रांगेत
3 ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी लढावे लागेल
Just Now!
X