20 September 2020

News Flash

राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांना भाजपात आणा, गिरीश बापटांचा सल्ला

राष्ट्रवादीमधील एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळे राष्ट्रवादीमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून आपले आंबे सडवू नका. हल्लाबोलसारख्या कार्यक्रमांनी महाराष्ट्रातील जनता फसणार नाही.

भाजपचे नेते गिरीश बापट. (संग्रहित छायाचित्र)

आपल्या वक्तव्यामुळे नेहमी वादात अडकणारे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका तर केलीच शिवाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपात आणा असा सल्लाही देऊन टाकला. मावळ येथील पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपामध्ये आणून आपले आंबे खराब करू नका, अशी असा टोला त्यांनी लगावला. शिवाय शिवसेना भाजपाचा मित्र पक्ष असल्याने त्याचे कार्यकर्ते भाजपात आले तर येऊ द्या, असे म्हणत शिवसेनेचे कार्यकर्ते फोडा असा अप्रत्यक्ष सल्लाच त्यांनी दिला.

राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते आणू नका, शिवसेनेतील कार्यकर्ते येऊद्यात ते आपले मित्र पक्ष आहेत. राष्ट्रवादीमधील एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळे राष्ट्रवादीमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून आपले आंबे सडवू नका, अशी टीका बापट यांनी केली. हल्लाबोलसारख्या कार्यक्रमांनी महाराष्ट्रातील जनता फसणार नाही. जनतेला प्रत्यक्ष काम कोण करतं हे माहीत आहे. त्यामुळे येणाऱ्या भविष्यात भाजपाच्या नेतृत्वात काम करेल ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, असं बापट म्हणाले. भाजपा पक्ष नसून एक कुटुंब आहे. याचा अनुभव शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना येईलच. तुम्ही आता या कुटुंबात आला आहात, तुमचं दुःख ते आमचं असेल, इतकं संवेदनशील राहू असं बापट म्हणाले. मावळ मधील मातीने मला मोठं केलं आहे, याची जाणीव असल्याचे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 3:59 pm

Web Title: bjp leader minister girish bapat criticized on ncp and invite shiv sena party worker in bjp
टॅग Girish Bapat
Next Stories
1 भ्रष्टाचाराचे आरोप खोटे निघाल्यास मला कुठेही फाशी द्या, धनंजय मुंडेंचे सरकारला आव्हान
2 उपचाराच्या नावाखाली नको त्या ठिकाणी स्पर्श करणाऱ्या आयुर्वेदीक डॉक्टरला पुण्यातून अटक
3 पुणे : तमाशात नाचण्यावरून दोन गटात हाणामारी, १६ जणांविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
Just Now!
X