भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह त्यांच्या मुलाविरोधात न्यायालयाच्या आदेशाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा काल (शुक्रवार) दाखल करण्यात आला. त्यानंतर आज(शनिवार) लोढा ग्रुपतर्फे(मायक्रोटेक डेव्हलपर्स) याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं.

वरळीतील सदनिका खरेदी व्यवहाराशी संबंधित महिला अनेक वर्षांपासून थकबाकीदार आहे. तसेच, संबधित महिलेने देय असलेले व्याज देखील देण्यास नकार दिला असून, याबाबत कंपनीने वर्षभरापूर्वीच रेराकडे तक्रार नोंदविलेली असल्याचे लोढा ग्रुपतर्फे(मायक्रोटेक डेव्हलपर्स) सांगण्यात आलं आहे.

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासह तिघांवर खंडणीचा गुन्हा

तसेच, या प्रकरणी कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितेल, की तक्रारदार महिलने सदनिका व्यवहारातील उर्वरीत रक्कम भरण्यास चालढकल केली असून, तिने आमच्याविरोधात मुंबईतील संबंधित पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रार दिली होती. मात्र, त्यांसंबधीचे कोणतेही पुरावे न मिळाल्यामुळे ते प्रकरण बंद करण्यात आले. कंपनीने याबाबत कोणतीही गैरप्रक्रिया केली नसल्याचे त्यामुळे सिद्ध झाले आहे.