पुण्यातील संभाजी बागेतील राम गणेश गडकरी यांचा पुतळा मागील दोन महिन्यापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यानी हटवला होता. त्यावर मोठा वाद निर्माण झाला होता. आता राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील सन्मानाने बसविला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी आज केली. त्यांच्या या भूमिकेने भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी  नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानातून हटवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भाजप आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या होत्या की, महापालिकेत भाजप ची सत्ता आल्यास महिन्याभरातच गडकरींचा पुतळा सन्मानाने बसवू.

Sambhaji Bhide Meets Devendra Fadnavis in Sangli
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कानात संभाजी भिडेंनी नेमकं काय सांगितलं? चर्चांना उधाण
220 former corporators of Kolhapur with the support of Shrimant Shahu Maharaj Chhatrapati
कोल्हापुरातील २२० माजी नगरसेवक श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या पाठीशी
Sanjay Mandlik, Shahu Maharaj,
आताचे महाराज दत्तक आलेले; ते खरे वारसदार नाहीत; संजय मंडलिक यांची काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराजांवर टीका
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन

त्यांच्या विधानाचा संभाजी ब्रिगेड संघटनेनी निषेध केला होता. आज आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, थोर नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा सन्मानाने बसविण्याची जबाबदारी ही महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांची आहे. गडकरी यांच्या पुतळ्यासोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा देखील सन्मानाने बसविण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन. अशी भूमिका आमदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली आहे.