News Flash

पुण्यात ‘बाजीराव-मस्तानी’ला भाजपचा विरोध, ‘सिटीप्राईड’मधील आजचे शो रद्द

भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सिटीप्राईडमधील 'बाजीराव-मस्तानी'चे आजचे सर्व खेळ रद्द

बाजीराव-मस्तानीला भाजपचा विरोध

बहुचर्चित ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाला भाजपने विरोध दर्शवला आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहातील ‘बाजीराव-मस्तानी’चे आजचे सर्व खेळ रद्द करावे लागले आहेत. चित्रपटातील गाण्यांमुळे ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच वादाच्या भोवऱयात सापडला होता. भाजपच्या पुण्यातील कोथरुड शाखेने ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहाच्या मालकांना ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट प्रदर्शित केल्यास होणाऱया नुकसानाची जबाबदारी चित्रपटगृह मालक आणि संचालकांची असेल, असा धमकीवजा इशारा दिला होता. त्यानंतर आज सकाळी ‘बाजीराव-मस्तानी’चा सकाळी ८ वाजताचा खेळ सुरू होण्याआधी ‘सिटीप्राईड’ चित्रपटगृहाबाहेर भाजप कार्यकर्ते जमा झाले आणि चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करण्यास सुरूवात केली. भाजप कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने चित्रपटगृहाने ‘बाजीराव-मस्तानी’चे आजचे सर्व खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
भाजप कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाच्या परिसरात लावण्यात आलेले चित्रपटाचे पोस्टर्स देखील काढून टाकले. या चित्रपटातून भारतीय इतिहासाचे विकृतीकरण केल्याने तो प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. ‘सिटीप्राईड’प्रमाणेच इतर चित्रपटगृहांबाहेर देखील या चित्रपटाविरोधात आंदोलन करणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
चित्रपटात मस्तानी आणि काशीबाई यांना एका गाण्यात एकत्र नाचताना दाखविण्यात आल्याने विरोधाचा ‘पिंगा’ सुरू आहे. त्यानंतर  चित्रपटातील ‘मल्हारी’ गाण्यात बाजीराव यांना नाचताना दाखविण्यात आल्याने हा विरोध आणखी वाढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 8:00 am

Web Title: bjp opposed bajirao mastani movie shows canceled in city pride theater pune
टॅग : Bajirao Mastani
Next Stories
1 तीनशे रुपयांच्या लढय़ातून ९,६०० रुपयांची भरपाई!
2 ‘इसिस’सोबत जाण्याची तयारी केलेल्या तरुणीचे समुपदेशन
3 कंपनी सरकार हवे, की लोकशासन?
Just Now!
X