News Flash

बारा बलुतेदारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा

भाजपचे आंदोलन

भाजपचे आंदोलन

पुणे : करोना विषाणू प्रादूर्भावाच्या संकटामुळे बारा बलुतेदार आर्थिक अडचणीत असल्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या खासदार, आमदार यांच्याकडून विधानभवन येथे आंदोलन करण्यात आले.

खासदार गिरीश बापट, आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर आणि सुनील कांबळे यांनी आंदोलन करून राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांचे लक्ष वेधले.  करोना विषाणू प्रादूर्भावाच्या संकटामुळे  टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील बारा बुलतेदार, रिक्षाचालक, कुंभार, लाँड्रीचालक, नाभिक आणि अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

अनेक व्यावसायिकांना बँके च्या कर्जाचे हप्ते भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक पॅके ज जाहीर करावे, याकडे आंदोलनाद्वारे लक्ष वेधल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 4:13 am

Web Title: bjp protest in pune for financial packages zws 70
Next Stories
1 परस्पर अंतर राखण्यासाठी खास उपकरण
2 पुण्यात करोनाचा कहर, दिवसभरात तब्बल ८२२ नवे रुग्ण, १९ जणांचा मृत्यू
3 पिंपरी-चिंचवड : तोंडाला रुमाल बांधला म्हणून दंडात्मक कारवाई; पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Just Now!
X