News Flash

भाजपने टोलची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

जनमत चाचण्यांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असताना पक्षाने टोलबाबतची भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली

| October 12, 2014 03:05 am

राज्यातील टोलच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात उल्लेख नाही. जनमत चाचण्यांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असताना पक्षाने टोलबाबतची भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
टोलच्या जिजिया कराबाबत राज्यात प्रचंड असंतोष आहे. याची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी ‘टोलचा खेळ मीच सुरू केला आणि तो मीच संपवणार’ असे उद्गार काढले होते. त्यामुळे भाजपच्या दृष्टिपत्रात याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट होईल, अशी जनतेला अपेक्षा होती. परंतु, शनिवारी प्रसिद्ध झालेल्या भाजपच्या दृष्टिपत्रात चुकून किंवा जाणून बुजून याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असताना या विषयावर त्यांनी तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे, अशी मागणी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 3:05 am

Web Title: bjp toll enact sajag nagrik manch
टॅग : Bjp,Sajag Nagrik Manch
Next Stories
1 वैद्यकीय क्षेत्रात परिहार सेवेला महत्त्व हवे – डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी
2 जाहिरातींसाठी भाजपकडे २३ हजार कोटी आले कुठून? – आनंद शर्मा
3 जाहीरनाम्याच्या छपाई खर्चातही बनवाबनवी!
Just Now!
X