पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष (पीएमपीएमएल) तुकाराम मुंढे यांची बदली करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. तुकाराम मुंढे हेकेखोर आहेत. त्यांच्यामुळे उत्त्पन्न वाढेल, अशी अपेक्षा असताना उत्पन्न घटलं. त्यांनी अनेक कामगारांना रस्त्यावर आणले, असा आरोप करत एकनाथ पवार यांनी मुंढेंच्या बदलीची मागणी केली. ही मागणी माझ्या एकट्याची नसून सर्व भाजपा नगरसेवकही याच मताचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुकाराम मुंढे यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यापासूनच ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मुंढे शिस्तप्रिय असून अनेक टोकाच्या भूमिका त्यांनी घेतलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच १५८ पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय मुंढे यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच पदाधिकारी नाराज असून आता पिंपरी-चिंचवडमधील सत्तारूढ नेते एकनाथ पवार यांनी त्यांची बदली करावी, असं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहलं आहे. ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे महापौर नितीन काळजे यांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला असला तरी आपल्याला या निर्णयाबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

‘पीएमपीएमएल’च्या बडतर्फ चालकांचे पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना साकडे

पीएमपीएमएलच्या बसचालकांनी नुकतीच महापौरांची भेट घेतली होती. पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी केलेली बडतर्फीची कारवाई अयोग्य असल्याचे यावेळी बसचालकांनी सांगितले. त्यानंतर नोकरीवर पुन्हा रुजू करावे यासाठी महापौर आणि पीएमपीएमएलचे संचालक नितीन काळजे हे पत्र देणार होते. मात्र, आता सत्तारूढ नेत्यांनीच मुंढे यांच्या बदलीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या १५८ बदली चालकांना वेळेवर बदली मिळत होती. मात्र, तुकाराम मुंढे आल्यापासून काम मिळणं बंद झालं आणि उलट गैरहजेरीचा ठपका ठेवण्यात आला, असा आरोप चालकांनी केला होता. त्यामुळे आता भाजपाच्या दबावामुळे नवी मुंबई पाठोपाठ पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली होणार का ? हे पाहणं महत्वाचे ठरेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp wants pmpml tukaram mundhe transfer
First published on: 18-01-2018 at 17:29 IST