News Flash

गुजरातमध्ये भाजप पराभूत होईल; संजय काकडे यांचे भाकीत

भाजपला दिला घरचा आहेर

संजय काकडे (संग्रहित छायाचित्र)

गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला की काँग्रेसला सत्ता मिळणार, याबाबत अंदाज व्यक्त केले जात असतानाच भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणामुळे भाजप गुजरात निवडणुकीत पराभूत होईल, असा दावा काकडे यांनी केला आहे. तसेच अन्य पक्षांशी हातमिळवणी करुनही भाजपला तेथे सत्ता मिळविता येणार नाही, असेही काकडे यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपच्या वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.

गुजरात निवडणुकीतील मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला असून निवडणुकीच्या निकालावरुन विविध माध्यमातून आणि सर्वेक्षणातून अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षालाच संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी हा अंदाजच चुकीचा असल्याचा दावा केला आहे.

भाजप गुजरातमध्ये कित्येक वर्षांपासून सत्तेत होता. यंदा परिस्थिती बदली आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील वातावरणाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे. तसेच मुस्लीम समाजातील मतदारही भाजपवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना गुजरातमध्ये लक्ष केंद्रीत करता आले नाही. त्यातच पटेल समाजाचा नेता हार्दिक पटेल याची सीडी हा मुद्दाही चुकीच्या वेळी पुढे आणण्यात आला आहे. निवडणुकीच्या कालावधीत विकासाच्या मुद्दयावर भर देण्यात आला नाही. या सर्व बाबी विचारात घेता निवडणूक जिंकणे अडचणीचे ठरेल, असे काकडे यांचे म्हणणे आहे.

गुजरात निवणुकीच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्येही याच बाबी प्रकर्षाने पुढे आल्याचे त्यांनी सांगितले. पुणे महापालिका निवणुकीनंतर मतमोजणीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजपला शहरात ९२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर महापालिका निवडणुकीत भाजपला ९८ जागा मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर काकडे यांच्या या दाव्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 9:19 pm

Web Title: bjp will lose in gujarat says sanjay kakade
Next Stories
1 ‘स्मार्टनेस’ किसान प्रदर्शन, शेतकऱ्यांचा सेल्फी मूड ठरला लक्षवेधी
2 पुण्यात २३ वर्षीय महिलेवर बलात्कार; दोघांना अटक
3 महोत्सवांसाठी पाच कोटींची उधळपट्टी
Just Now!
X