News Flash

पुणे : सरपंच, उपसरपंचपदासाठी जादूटोणा, पिंपळाच्या झाडाला नाव असलेली लिंब खिळयाने ठोकली

लिंब पिंपळाच्या झाडाला खिळण्याने ठोकण्यात आली असून जादूटोणा करण्यात आला आहे.

पुण्याच्या वडगाव मावळमध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने अघोरी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पिंपळाच्या झाडाला टाकावे ग्रामपंचायतच्या तीन सदस्यांची नावे असलेली लिंब खिळ्याने ठोकून जादूटोणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

सविस्तर माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील टाकावे येथे एक जादूटोणाच प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून टाकावे येथील इंद्रायणी नदीच्या कडेला ग्रामपंचायत सदस्य अविनाश असवले, भूषण असवले आणि ऋषीनाथ शिंदे यांची नाव असलेली लिंब पिंपळाच्या झाडाला खिळण्याने ठोकण्यात आली असून जादूटोणा करण्यात आला आहे.

याप्रकरणी, अविनाश असवले यांनी पोलिसात तक्रार दिली असून हा सर्व प्रकार सरपंच आणि उपसरपंच पदाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा गांभीर्याने तपास करावा अस त्यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 3:54 pm

Web Title: black magic for sarpanch post in pune kjp 91 dmp 82
Next Stories
1 पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीची धाड
2 सांस्कृतिक नगरी पूर्वपदावर
3 वनविभागाकडून शीघ्र प्रतिसाद दलाची स्थापना
Just Now!
X