News Flash

धक्कादायक! पुण्यात फालुदा आईस्क्रीममध्ये सापडला ब्लेड

रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना फेरीवाल्याकडचे आईस्क्रीम खाण्याची सवय असते. काही वेळा फेरीवाल्यांकडून असे आईस्क्रीम बनवताना निष्काळजीपणा दाखवला जातो

रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना फेरीवाल्याकडचे आईस्क्रीम खाण्याची सवय असते. काही वेळा फेरीवाल्यांकडून असे आईस्क्रीम बनवताना निष्काळजीपणा दाखवला जातो. जो ग्राहकाच्या जीवावर बेतू शकतो. पुण्यामध्ये राहणारे मनोज सुरेश अहुजा यांच्या बाबतीतही असेच घडले. पण ते सुदैवी ठरले. मनोज यांना काही इजा झाली नाही.

पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारे मनोज अहुजा पिंपळे सौदागर येथे राहतात. एक सप्टेंबरला रात्रीच्या जेवणानंतर ते फेरफटका मारण्यासाठी खाली उतरले होते. त्यावेळी त्यांनी रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडून फालुदा आईस्क्रीम विकत घेतले. मनोज यांनी जे आईस्क्रीम घेतले होते त्यामध्ये रेझर ब्लेड होता. आईस्क्रीम खात असताना तोंडामध्ये रेझर ब्लेड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याच रात्री सांगवी पोलीस स्टेशनमध्ये विक्रेत्याविरोधात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी कलम ३३६ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी रतन गादारीला अटक केली. गादारी आता जामिनावर बाहेर आहे. माझी पत्नी आणि मी फालुदा खाण्यासाठी गेलो होतो. मी आईस्क्रीचा शेवटचा तुकडा माझ्या तोंडात टाकला. त्यावेळी काहीतरी टोचत असल्याचे मला जाणवले. मी घाबरलो. मी ती वस्तू तोंडातून बाहेर काढली त्यावेळी मला धक्काच बसला. कारण टोचणारी ती वस्तू ब्लेड होती. सुदैवाने तो ब्लेड माझ्या अन्ननलिकेत गेला नाही. अनेक जण खासकरुन लहान मुल रात्रीच्यावेळी अशा फेरीवाल्यांकडून आईस्क्रीम खात असतात म्हणून मी तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती मनोज यांनी दिली. गादारीने तीन महिन्यांपूर्वी आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:59 pm

Web Title: blade found in pune techie falooda icecream dmp 82
Next Stories
1 पुणे: लोणावळ्यात खोल दरीत सापडला सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृतदेह
2 …म्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला मोदी आले नाहीत -मुख्यमंत्री
3 सत्यजित देशमुख भाजपात दाखल; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
Just Now!
X