रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना फेरीवाल्याकडचे आईस्क्रीम खाण्याची सवय असते. काही वेळा फेरीवाल्यांकडून असे आईस्क्रीम बनवताना निष्काळजीपणा दाखवला जातो. जो ग्राहकाच्या जीवावर बेतू शकतो. पुण्यामध्ये राहणारे मनोज सुरेश अहुजा यांच्या बाबतीतही असेच घडले. पण ते सुदैवी ठरले. मनोज यांना काही इजा झाली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारे मनोज अहुजा पिंपळे सौदागर येथे राहतात. एक सप्टेंबरला रात्रीच्या जेवणानंतर ते फेरफटका मारण्यासाठी खाली उतरले होते. त्यावेळी त्यांनी रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडून फालुदा आईस्क्रीम विकत घेतले. मनोज यांनी जे आईस्क्रीम घेतले होते त्यामध्ये रेझर ब्लेड होता. आईस्क्रीम खात असताना तोंडामध्ये रेझर ब्लेड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याच रात्री सांगवी पोलीस स्टेशनमध्ये विक्रेत्याविरोधात तक्रार नोंदवली.

पोलिसांनी कलम ३३६ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी रतन गादारीला अटक केली. गादारी आता जामिनावर बाहेर आहे. माझी पत्नी आणि मी फालुदा खाण्यासाठी गेलो होतो. मी आईस्क्रीचा शेवटचा तुकडा माझ्या तोंडात टाकला. त्यावेळी काहीतरी टोचत असल्याचे मला जाणवले. मी घाबरलो. मी ती वस्तू तोंडातून बाहेर काढली त्यावेळी मला धक्काच बसला. कारण टोचणारी ती वस्तू ब्लेड होती. सुदैवाने तो ब्लेड माझ्या अन्ननलिकेत गेला नाही. अनेक जण खासकरुन लहान मुल रात्रीच्यावेळी अशा फेरीवाल्यांकडून आईस्क्रीम खात असतात म्हणून मी तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती मनोज यांनी दिली. गादारीने तीन महिन्यांपूर्वी आईस्क्रीमचा व्यवसाय सुरु केला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blade found in pune techie falooda icecream dmp
First published on: 16-09-2019 at 13:59 IST